Bank FD Rates : खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांनी आपल्या ग्राहकांना ख्रिसमस गिफ्ट दिले आहे. या बँकांनी आपल्या एफडी दरात वाढ करून ग्राहकांना खुश केले आहे, अशातच तुम्हीही संध्या चांगल्या परताव्याची आणि सुरक्षित गुंतवणूक योजना शोधत असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे.
HDFC आणि ICICI बँकेने त्यांच्या FD (फिक्स्ड डिपॉझिट) वरील व्याजदरात मोठे बदल केले आहेत. ICICI बँकेने 5 डिसेंबर 2023 पासून 2 कोटी रुपयांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर 5 कोटी रुपयांपर्यंत बदलले आहेत.
बँकेच्या म्हणण्यानुसार, 7 दिवस ते 14 दिवसांच्या कालावधीसाठी 4.75% चा सर्वात कमी एफडी दर आणि 390 दिवस ते 15 महिन्यांच्या कालावधीसाठी सर्वाधिक 7.25% एफडी दर ऑफर केला जातो. त्याच वेळी, HDFC बँकेने 5 डिसेंबर 2023 पासून लागू होणार्या 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेसाठी मुदत ठेवींच्या दरांमध्ये बदल केले आहेत.
ICICI बँकेचे एफडीवरील व्याजदर :-
-ICICI बँक 7 दिवस ते 14 दिवसांच्या कालावधीसाठी 2 कोटी ते 5 कोटी रुपयांच्या FD वर 4.75% व्याज दर देत आहे.
-30 ते 45 दिवसांच्या कालावधीसाठी तुम्हाला 5.5% व्याजदर मिळू शकतात.
-ICICI बँक 46 ते 60 दिवसांच्या कालावधीसाठी 5.75% ऑफर करत आहे.
-बँक 61 ते 90 दिवसांच्या कालावधीसाठी 6% व्याज देत आहे.
-91 दिवस ते 120 दिवसांच्या कालावधीसाठी, ICICI बँक 6.5 टक्के व्याज देत आहे.
-बँक 121 दिवस ते 150 दिवसांच्या कालावधीतील FD साठी 6.5% ऑफर करत आहे.
-271 दिवस ते 289 दिवसांच्या कालावधीसाठी, ICICI बँक 6.75% व्याज दर देत आहे.
-1 वर्ष ते 389 दिवसांच्या कालावधीसाठी, ICICI बँक 7.25% ऑफर करत आहे.
HDFC बँकचे एफडीवरील व्याजदर :-
खासगी क्षेत्रातील बँक, एचडीएफसी बँकेनेही त्यांच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात बदल करून ग्राहकांना चांगली बातमी दिली आहे. बँकेने 5 डिसेंबर 2023 पासून लागू होणार्या 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेसाठी मुदत ठेव दरांमध्ये बदल केले आहेत. बँकेची FD दर पुढीलप्रमाणे :-
-HDFC बँक 7 दिवस ते 14 दिवसांच्या कालावधीसाठी 2 कोटी ते 5 कोटी रुपयांच्या FD वर 4.75% व्याज दर देत आहे.
-30 ते 45 दिवसांच्या कालावधीसाठी तुम्हाला 5.5% व्याजदर मिळू शकतात.
-HDFC बँक 46 ते 60 दिवसांच्या कालावधीसाठी 5.75% ऑफर करत आहे.
-HDFC बँक 90 ते 120 दिवसांच्या कालावधीसाठी 6.5% ऑफर करत आहे.
-बँक 121 दिवस ते 150 दिवसांच्या कालावधीतील FD साठी 6.65% ऑफर करत आहे.