Bank FD : काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात झपाट्याने वाढ केली आहे. आता त्याचा फायदा बँक आपल्या ग्राहकांना देत असून बँक बचत खाते आणि एफडी योजनेवर ग्राहकांना सर्वात जास्त व्याज देत आहे. अशा परिस्थितीत, आता जर तुम्ही FD योजनांमध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी ही एक शानदार संधी आहे.
विशेष म्हणजे काही बँकांनी एफडीवरील व्याज दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे अलीकडच्या मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी लोकांचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. शिवाय मोठ्या संख्येने तरुणही आता एफडीमध्ये पैसे गुंतवत आहेत.
सामान्य ग्राहकांना किती मिळेल परतावा?
आता इक्विटास स्मॉल फायनान्स बँक सामान्य ग्राहकांना FD वर 8.5% व्याज देत आहे. ही बँक 7 दिवस ते 29 दिवसांच्या कालावधीतील FD वर 3.5% व्याज देत असून बँक 30 ते 45 दिवसांच्या दरम्यान च्या FD वर 4 टक्के व्याजदर मिळत आहे. इतकेच नाही तर बँकेकडून आपल्या एफडीधारकांना 46 ते 90 दिवसांच्या कालावधीतील एफडीवर 4.5 टक्के व्याजदर देण्यात येत आहे.
तसेच इक्विटास स्मॉल फायनान्स बँक 91 ते 180 दिवसांच्या कालावधीतील FD वर 5.25 टक्के व्याजदर देत आहे. 181 ते 364 दिवसांच्या मुदतीच्या FD वर, बँक 6.25 टक्के व्याजदर देत असून एका वर्षात परिपक्व होणाऱ्या एफडीवर ८.२ टक्के व्याजदर मिळत आहे.
जाणून घ्या एक वर्ष आणि एका दिवसाचा परतावा
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक एक वर्ष आणि एका दिवसात परिपक्व होत असणाऱ्या FD वर 8 टक्के व्याजदर देत आहे. ही बँक 367 ते 443 दिवसांच्या दरम्यानच्या मुदतीच्या FD साठी 8.2 टक्के व्याज दर देत आहे. 444 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर ८.५ टक्के व्याजदर या बँकेकडून उपल्बध करून देण्यात आला आहे.
ही बँक 445 दिवस ते 18 महिन्यांच्या कालावधीतील FD साठी 8.2 टक्के व्याजदर देत आहे. बँक 18 महिने आणि एक दिवस ते दोन वर्षांच्या मुदत ठेवींवर 7.75 टक्के व्याज मिळत आहे.