Bank FD Update:- गुंतवणुकीमध्ये बँकांमधील मुदत ठेव म्हणजेच फिक्स डिपॉझिट ही एक सुरक्षित गुंतवणूक आणि निश्चित परतावा देणारे म्हणून ओळखले जाते. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार बँकांमध्ये आणि इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करतात. या सगळ्या बँकांचे मात्र व्याजदर वेगवेगळे असतात.
त्यामुळे मुदत ठेव करण्याआधी कुठल्या बँकेमध्ये सध्या किती व्याजदर मिळत आहे हे देखील माहिती असते तितकेच गरजेचे असते. याकरिता या लेखामध्ये आपण अशा पाच बँकांची माहिती घेणार आहोत ज्यांनी नुकतेच त्यांच्या व्याजदरामध्ये बदल केलेला आहे.
ॲक्सिस बँक, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आणि आयसीआयसीआय बँक व इतर बँकांचा समावेश आहे. नेमक्या आता या बँकांच्या माध्यमातून नवीन बदललेल्या दरानुसार किती व्याज मिळत आहे हे आपण बघू.
या बँकांनी मुदत ठेवीवरील व्याजदरात केले बदल
1- ॲक्सिस बँक– ॲक्सिस बँक ही देशातील एक महत्त्वाची बँक असून या बँकेने एक जुलैपासून त्यांचे मुदत ठेव व्याजदर बदलले असून बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार बघितले तर बँकेने तीन कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवर नवीन दर लागू केले आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना पाच ते दहा वर्षाच्या एफडीवर सर्वाधिक म्हणजेच 7.75 टक्के व्याज मिळणार आहे तर सामान्य ग्राहकांकरिता 17 ते 18 महिन्यापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 7.2% पर्यंत व्याज मिळणार आहे.
2- उज्जीवन स्मॉल फायनान्स– उज्जीवन फायनान्स बँकेच्या माध्यमातून देखील एफडी व्याजदरामध्ये एक जुलैपासून बदल करण्यात आला आहे व त्या बदलानुसार बघितले तर ज्येष्ठ नागरिकांना आता बारा महिन्याच्या एफडीवर 8.75 टक्के म्हणजे सर्वाधिक व्याजदर मिळणार आहे. त्याचप्रमाणे सामान्य लोकांना बारा महिन्याच्या एफडीवर 8.25 टक्के व्याज मिळू शकते.
3- आयसीआयसीआय बँक– या बँकेच्या माध्यमातून देखील एफडी व्याजदरात बदल करण्यात आलेले असून या बँकेचे नवीन व्याजदर हे तीन कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवर लागू होणार आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 7.75 टक्के व्याजदर मिळणार आहे तर सामान्य लोकांना पंधरा महिन्यापासून ते दोन वर्षाच्या कालावधीच्या एफडीवर 7.2% पर्यंत व्याज मिळेल.
4- पंजाब आणि सिंध बँक– या बँकेच्या वेबसाईट नुसार बघितले तर या बँकेने देखील तीन कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवर नवीन व्याजदर लागू केले असून यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या 666 दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक 7.80 टक्क्यांचे व्याज मिळणार आहे तर सामान्य लोकांना 666 दिवसांच्या कालावधी करिता 7.3% पर्यंत व्याज मिळू शकते.
5- बँक ऑफ इंडिया– बँक ऑफ इंडियाने 3 जून पासूनच एफडी व्याजदरामध्ये सुधारणा केल्या असून जर आपण बँकेच्या वेबसाईटनुसार माहिती घेतली तर त्यानुसार हे बदललेले व्याजदर तीन कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवर लागू आहेत. बँकेच्या माध्यमातून 666 दिवसांच्या एफडीवर जेष्ठ नागरिकांना सर्वाधिक 7.80% व्याज मिळेल. तर सामान्य लोकांना 666 दिवसांच्या एफडीवर 7.3% पर्यंत व्याज मिळणार आहे