Bank Holiday : जर तुम्ही बँकेत जाणार असाल तर ही महत्त्वाची बातमी वाचूनच बँकेत जा. कारण जून महिन्यात एचडीएफसी आणि कोटक महिंद्रा बँकेच्या बँकिंग सेवा बंद राहणार आहेत. जर तुम्ही या दोन्ही बँकांचे ग्राहक असाल तर बँकेचा सुट्टीचा कालावधी पाहूनच बँकेत जा.
नाहीतर तुम्हाला नाहक त्रास सहन करावा लागू शकतो. दरम्यान सर्वात महत्त्वाचे म्हणजे यापूर्वीही या दोन बँकांच्या बँकिंग सेवा बंद करण्यात आल्या होत्या. अशातच पुन्हा एकदा या बँकांच्या सेवा बंद करण्यात आल्या आहेत. या सेवा का बंद असणार आहेत? जाणून घ्या यामागचे कारण.
एचडीएफसी बँक
सर्व ग्राहकांना पाठवण्यात आलेल्या ईमेलमध्ये, एचडीएफसी बँकेने असे म्हटले आहे, “तुम्हाला सर्वोत्कृष्ट बँकिंग अनुभव प्रदान करण्याच्या आमच्या सतत वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, आम्ही आवश्यक ती प्रणाली देखभाल आणि सुधारणा करत आहोत.” आम्ही या सुधारणा करताना, आमच्या काही सेवा बंद राहणार आहेत. पुढे या बँकेने असेही म्हटले आहे की 4 जून रोजी पहाटे 3 ते सकाळी 6 दरम्यान त्यांच्या बँकिंग सेवांवरही परिणाम झाला आहे.
कोटक महिंद्रा बँक
कोटक महिंद्रा बँकेने नुकत्याच सादर केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की त्यांचे डेबिट कार्ड, स्पेंज कार्ड तसेच गिफ्ट कार्ड सेवा 10 जून रोजी काही तासांसाठी ग्राहकांना उपलब्ध नसतील. यापूर्वी म्हणजे 3 जून रोजी बँकेच्या सेवा काही तासांसाठी बंद होत्या.
तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशभरातील बँका जून 2023 मध्ये सर्व रविवार आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारसह 12 दिवस बंद राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील, खाजगी क्षेत्रातील तसेच सहकारी बँकांसह सर्व बँका दर रविवारी आणि प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहणार आहेत. तसेच याच दरम्यान इतरही अनेक सण आहेत ज्यांच्या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या असणार आहेत.