Bank Locker Compensation : प्रत्येकाचे बँकेत खाते असते. प्रत्येक बँक वेगवेगळे फायदे देत असते. काही सरकारी तसेच काही खाजगी बँका आहेत. प्रत्येक बँकेचे व्याजदेखील वेगळे असते. जास्त व्याज देणाऱ्या बँकेत खाते ग्राहक चालू करत असतात.
अनेकजण बँक लॉकरमध्ये सामान ठेवत असतात. जर बँक लॉकरमधून सामान चोरी झाले किंवा हरवले तर त्या ग्राहकाला नुकसान भरपाई मिळते का? असा अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित होतो. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती.
चोरी झाल्यास किती मिळते भरपाई ?
सर्वात महत्त्वाचे म्हणजे बँक लॉकरचे योग्य कार्य आणि त्याच्या संपूर्ण सुरक्षिततेसाठी जबाबदार असते. अशा स्थितीत बँकेच्या निष्काळजीपणामुळे तुमच्या लॉकरचे काही नुकसान झाल्यास तर ती बँकेची जबाबदारी असते. तुम्हाला योग्य ती भरपाई मिळते.
चोरी, दरोडा किंवा इमारत कोसळली तर बँक लॉकरमधून तुमचे सामान चोरी झाले तर नियमानुसार, बँक तुम्हाला नुकसानभरपाई म्हणून लॉकरच्या भाड्याच्या 100 पट रक्कम मिळते. समजा जर तुमच्या लॉकचे भाडे 3,000 रुपये असल्यास चोरी, दरोडा किंवा इमारत कोसळली तर बँक लॉकरमधून वस्तू हरवल्या तर तुम्हाला 3,00,000 रुपये भरपाई म्हणून मिळते.
एसबीआय माहितीनुसार, बँकेच्या परिसरात चोरी, दरोडा आणि इमारत कोसळण्याची कोणतीही घटना होऊ नये याची खात्री करणे ही शाखेची जबाबदारी असते.कोणत्या कारणांमुळे किंवा कर्मचार्यांच्या फसवणुकीमुळे बँकेच्या आवारात असणाऱ्या लॉकरमधून वस्तू गायब झाल्या तर बँक ग्राहकाला लॉकर भाड्याच्या 100 पट भरपाई मिळते.
लॉकर निष्क्रिय झाले तर?
समजा एखाद्या ग्राहकाने लॉकर भाड्याने घेतल्यास भाडे वेळेवर मिळते. समजा सात वर्षांपेक्षा जास्त काळ लॉकर उघडला नसेल तर बँक लॉकर निष्क्रिय मानेल. त्यानंतर नॉमिनी आणि कायदेशीर वारसांना बोलवण्यात येते. लॉकरमधील सामग्री पारदर्शक पद्धतीने ट्रान्सफर केली जाईल.