आर्थिक

Bank Locker : तुमच्याकडून बँकेच्या लॉकरची चावी हरवली तर काय?, जाणून घ्या…

Bank Locker : बँक लॉकर ही आज आपल्या सर्व भारतीयांची गरज बनली आहे. दागिन्यांपासून ते महत्वाच्या कागदपत्रांपर्यंत या वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेच्या लॉकरचा वापर केला जातो. पण याच बँकेच्या लॉकरची चावी हरवली तर काय करायचं? हा प्रश्न बहुतांश ग्राहकांच्या मनात येतो. तुम्हाला माहिती आहेच की, एक चावी बँकेकडे राहते आणि दुसरी चावी ग्राहकाकडे असते. या दोन्ही चाव्यांचा वापर केल्यावरच लॉकर उघडता येते. अशा परिस्थितीत ग्राहकाची चावी हरवली तर ही समस्या टाळण्यासाठी काय उपाय करता येतील या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

लॉकर चावी हरवल्यानंतर लगेच ‘या’ गोष्टी करा

तुमच्या बँकेच्या लॉकरची चावी हरवल्यावर लगेच एफआयआर दाखल करा आणि बँकांना कळवा. आता बँकेकडे दोन पर्याय आहेत, एकतर लॉकरची डुप्लिकेट चावी बनवा आणि ती तुम्हाला द्या. किंवा तुमच्या नावावर नवीन लॉकर जारी केले जाऊ शकते. डुप्लिकेट चावीमुळे सुरक्षेला धोका निर्माण होतो म्हणून सामान्यतः बँका नवीन लॉकर देतात. त्यामुळे जुने लॉकर फोडल्यानंतर तुमचे सामान नवीन लॉकरमध्ये हलवले जाते.

बँके लॉकर कसे फोडते?

पुढचा प्रश्न तुमच्या मनात येत असेल बँकेचे लॉकर कसे फोडले जाते? चावी हरवल्यानंतर बँकेला ग्राहकाला नवीन लॉकर द्यायचे असल्यास, ग्राहक बँकेला परवानगी देतो की त्याचे लॉकर त्याच्या समोर तोडले जाऊ शकते. तुम्हाला माहितीच असेल बँकेचे लॉकर उघण्यासाठी ग्राहकासोबत बँक अधिकारीही तिथे उपस्थित असतो, दरम्यान, दोघांनी चाव्या दिल्यावर बँक अधिकारी बाहेर जातो आणि ग्राहक आपले काम करतो, त्यामुळे गोपनीयता राखली जाते.

लॉकर जसे उघडले जाते तसेच तोडण्याची प्रक्रिया देखील असते. एकतर ग्राहक तिथे उपस्थित असेल किंवा बँक स्वतः ग्राहकाच्या लेखी परवानगीने लॉकर फोडू शकते. लॉकर फोडल्यानंतर बँक सर्व सामान दुसऱ्या लॉकरमध्ये हलवते.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts