Bank Of Baroda Update : मागील काही दिवसांपूर्वी बँक ऑफ बडोदाच्या नेटबँकिंग एप्लीकेशन बॉब अर्थात बीओबी वर्ल्डच्या नोंदणी शी संबंधित काही फसवणुकीचे प्रकरणे समोर आले असून यामध्ये बँकेची चूक असल्याचे मानले जात आहे. जर आपण मीडिया रिपोर्टचा विचार त्यानुसार यामध्ये अनेक बँकेच्या ग्राहकांची जी काही बँक खाती आहेत ते इतर दुसऱ्या व्यक्तींच्या मोबाईल नंबरशी रजिस्टर केली गेलेली आहेत व जे नियमबाह्य आहे.
या सगळ्या प्रकरणांमध्ये ग्राहकांना फसवणुकीपासून सुरक्षित राहता यावे याकरिता आरबीआयच्या माध्यमातून बँक ऑफ बडोदा ला त्यांच्या एप्लीकेशन वर नवीन ग्राहकांचे रजिस्ट्रेशन करण्यापासून मज्जाव करण्यात आलेला आहे. एवढेच नाही तर यामध्ये बँक कर्मचाऱ्यांवर देखील प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. काही प्रकरणांमध्ये बँक कर्मचाऱ्यांच्या संगनमताने फसवणूक करून फसवणूक करणाऱ्यांनी ग्राहकांच्या बँक खात्यातून पैसे काढण्याचा देखील आरोप केला गेला आहे.
काय आहे नेमके हे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाची सुरुवात ही मार्च 2022 मध्ये सुरू झाली. या कालावधीत बँकेच्या व्यवस्थापनाने बँकेच्या बीओबी वर्ल्ड एप्लीकेशनमध्ये ग्राहकांची नोंदणी वाढावी याकरिता प्रादेशिक शाखांवर प्रेशर आणला होता व यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी या ॲप्लिकेशनची डाउनलोड संख्या वाढावी याकरिता ज्या ग्राहकांच्या बँक खात्याला मोबाईल नंबर रजिस्टर नाही अशा खात्यांना दुसऱ्या व्यक्तींचा किंवा स्वतःचा नंबर रजिस्टर करून ग्राहकांचे बँक खाते लिंक केले.
त्यानंतर लिंक केलेल्या नंबर वर ओटीपी मिळाल्यानंतर ते नोंदणी पूर्ण केली गेली व यामुळे केल्यामुळे या ॲप्लिकेशनचे डाऊनलोड संख्या वाढली. यामध्ये काही मोबाईल नंबर हे बँक एजंटचे होते. त्यांनाच आपण बिझनेस करस्पॉन्डंट अर्थात बीसी म्हणून देखील ओळखतो. ते अतिशय दुर्गम भागामध्ये काम करतात.
अशा पद्धतीने बीओबी एप्लीकेशन डाउनलोड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या खात्यांना जो काही मोबाईल नंबर रजिस्टर केलेला होता तो नंतर अनरजिस्टर केला जात असे व तोच नंबर दुसऱ्या ग्राहकांच्या खात्यांना जोडण्यासाठी वापरला जात असे. एवढेच नाही तर क्षेत्रीय कार्यालयाच्या नोडल अधिकाऱ्याने ग्राहकांच्या बँक खात्याशी मोबाईल नंबर लिंक करण्याकरिता त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे मोबाईल नंबर देण्याची ऑफर दिल्याचे प्रकरण देखील यामध्ये समोर आले होते.
यावेळी इतर ग्राहकांच्या बँक खात्यांशी बेकायदेशीररित्या लिंक असलेल्यांनी त्या बँक खात्यांमधून पैसे काढले. प्राप्त अहवालानुसार या कालावधीमध्ये एकूण 362 ग्राहकांची फसवणूक झाली व त्यांचे 22 लाख रुपयांचे नुकसान झाले असे देखील माहिती समोर आली आहे.
तुमचे खाते सुरक्षित ठेवण्यासाठी या टिप्स वापरा
1- बँक खात्याला मोबाईल नंबर लिंक करा– बँकेत खाते उघडताच तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याशी तसेच नेट बँकिंग शी कनेक्ट करणे गरजेचे आहे. एकदा तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक झाला तर नवीन नंबर लिंक करता येत नाही.
2- व्यवहार सूचना– जेव्हा तुम्ही पैसे काढता किंवा डिपॉझिट करता तेव्हा मोबाईल फोनवर संदेश आला की नाही हे तपासणे गरजेचे आहे. कुठल्याही मोडने तुमच्या खात्यातून व्यवहार केला जात असेल तरी तुम्हाला रियल टाईम मेसेज मिळणे खूप गरजेचे आहे.
3- ओटीपी कुणालाही शेअर करू नका– तुमच्या मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी तुम्ही कधीही कुणाशी शेअर करू नये. एवढेच नाही तर रिझर्व बँकेच्या म्हणण्यानुसार बँक कर्मचाऱ्यांना देखील तुम्ही तुमचा पासवर्ड शेअर करू नये.
4- काही संशयास्पद आढळल्यास बँकेचे संपर्क साधावा– काही संशयास्पद कृती आढळून आल्यास ताबडतोब बँक आणि सायबर पोलिसांकडे तक्रार करणे गरजेचे आहे. बँकेच्या चुकीमुळे जर बेकायदेशीरपणे पैसे किंवा फंड ट्रान्सफर झाला असेल तर तो वसूल करण्याची जबाबदारी बँकेची आहे.