Bank Rules : आपल्या देशात अनेकदा बँक किंवा काही व्यक्ती चुकून चुकीच्या बँक खात्यात पैसे जमा करतात, अशास्थितीत तुम्हाला बँकेच्या या नियमाबद्दल माहिती आहे का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर सांगणार माहिती आहोत.
नुकतीच नोएडामध्येही एका घटना घडली एका खासगी बँकेने चुकून एका व्यक्तीच्या बँक खात्यात २६ लाख रुपये जमा केले. त्या व्यक्तीने ते सर्व पैसे त्याच्या खात्यातून काढून घेतले आहेत आणि ते पैसे बँकेला परत करण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत बँकेला या व्यक्तीकडून पैसे काढण्याचा कायदेशीर अधिकार आहे का?, असा प्रश्न उपस्थित होतो. जर त्या व्यक्तीने सर्व पैसे खर्च केले तर काय होईल?
तर चुकून जरी तुमच्या बँक खात्यात पैसे आले तरी तुम्ही त्या पैशाचे मालक झालात असे होत नाही. कायद्यानुसार ते पैसे परत करण्यास तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही हे पैसे परत न केल्यास बँक तुमच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 406 अंतर्गत गुन्हा नोंदवू शकते. दोषी आढळल्यास, तुम्हाला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते.
कलम 406 काय सांगतो?
जर एखाद्या व्यक्तीने, दुसर्या व्यक्तीची मालमत्ता किंवा कोणत्याही प्रकारचा पैसा अल्प कालावधीसाठी ताब्यात घेतल्यावर, तिचा दुरुपयोग केला, ती मालमत्ता किंवा पैसा खर्च केला किंवा कोणत्याही फसव्या मार्गाने आपल्या नावावर नोंदणी केली, तर आयपीसीच्या कलमानुसार नोंदणी केली जाऊ शकते. त्याच्यावर कलम 406 अन्वये कारवाई केली जाऊ शकते. बँक खात्यात चुकून आलेले पैसे परत न आपल्यास या कलमाखाली गुन्हा देखील दाखल करता येतो.
इतकेच नाही तर कलम 406 सोबतच, नागरी प्रक्रिया संहितेच्या कलम 34 आणि 36 अन्वये पैसे वसूल करण्याचा खटलाही दाखल केला जाऊ शकतो. त्यानंतर दिवाणी प्रक्रिया न्यायालयात वसुलीसाठी दावा दाखल करावा लागतो. त्यानंतर न्यायालय आरोपीच्या प्रत्येक मालमत्तेची तपासणी करेल, ती संलग्न करेल आणि त्यानंतर त्या मालमत्तेद्वारे पैसे वसूल केले जातील.
चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केल्यास काय करावे?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही चुकून चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या बँकेकडे तक्रार करावी. यानंतर, तुम्हाला तुमचे पैसे 48 तासांच्या आत मिळतील. यासह, ग्राहकाने पेटीएम, फोनपे आणि GooglePe इत्यादी सारख्या सेवा प्रदात्याकडे देखील तक्रार करावी. तुम्ही ज्या माध्यमाद्वारे पैसे हस्तांतरित केले आहेत त्या माध्यमाच्या ग्राहक सेवा क्रमांकावर कॉल करा.