Bank Update : तुम्ही देखील कॅनरा बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. ऐन सणासुदीच्या काळात बँकेने ग्राहकांना धक्का दिला आहे. बँकेच्या या निर्णयामुळे आता ग्राहकांच्या खिशावर अधिक भार पडणार आहे. बँकेच्या कोणत्या निर्णयामुळे ग्राहकांना धक्का बसला आहे? आणि या निर्णयाचा त्यांच्यावर कसा परिणाम होईल चला जाणून घेऊया…
सध्या बँकांकडून दर वाढवण्याची प्रक्रिया थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वी देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने आपले व्याजदर वाढवले होते आणि आता कॅनरा बँकेनेही तोच मार्ग स्वीकारला आहे. बँकेने आजपासून आपल्या MCLR दरात 5 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. तुमच्या माहितीसाठी MCLR दर सर्व प्रकारच्या कर्जांसाठी बेंचमार्क म्हणून काम करतो. हा किमान दर आहे ज्यावर बँक ग्राहकांना कर्ज देते.
बँकेने आज वाढीव MCLR दर जाहीर केले आहेत, तथापि, हे दर आज पासून लागू होतील. आत्तापर्यंत, कॅनरा बँकेच्या ग्राहकांसाठी MCLR दर 8.70 टक्के होता, जो आता 8.75 टक्के करण्यात आला आहे. हे दर 1 वर्षासाठी आहेत. या दरांसह, ग्राहकांसाठी वैयक्तिक, वाहन आणि गृह कर्जाचे दर निश्चित केले आहेत.
एचडीएफसीने यापूर्वीच धक्का दिला आहे
दोन दिवसांपूर्वी एचडीएफसी बँकेने एमसीएलआर दर 5 बेस पॉईंटने वाढवून ग्राहकांना धक्का दिला होता. हे वाढलेले दर 7 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. आरबीआयने सलग चौथ्यांदा रेपो दरात कोणताही बदल केला नसतानाही हे बदल होत आहेत.
पुढील बैठकीत रेपो दरात बदल शक्यता
मात्र, आता पुढील बैठकीत रुपयाच्या घसरत्या मूल्यासह महागाई रोखण्यासाठी आरबीआय रेपो रेटमध्ये वाढ करेल अशी अपेक्षा आहे. याबाबतचे संकेत आरबीआयने अनेक वेळा दिले आहेत. मात्र आतापासूनच सर्वसामान्यांच्या खिशावर दबाव येऊ लागला आहे. कॅनरा बँकेच्या या पावलामुळे जे लोक कर्ज घेणार आहेत आणि ज्यांनी आधीच घेतले आहेत त्यांचा ईएमआय वाढणार आहे.