Banking News : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने देशातील दोन बड्या बँकांवर मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने गेल्या काही महिन्यात देशातील अनेक बड्या बँकांवर कारवाई केली आहे. काही बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे तर काही बँकेचे चक्क लायसन्स रद्द करण्यात आले आहे.
आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आतापर्यंत अनेक बँकांवर कारवाई झाली आहे. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे देशातील दोन बड्या बँकांवर नुकतीच दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
मध्यवर्ती बँकेने अर्थातच आरबीआयने नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी या बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यामुळे मात्र सदर बँकेच्या खातेधारकांमध्ये मोठे संभ्रमाचे वातावरण आहे. आरबीआयच्या या दंडात्मक कारवाईमुळे ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था आहे.
अशा परिस्थितीत आता आपण आरबीआयने कोणत्या बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे, दंडात्मक कारवाई करण्याचे नेमके कारण काय आणि या कारवाईचा ग्राहकांवर कोणता परिणाम होणार या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आरबीआयने कोणत्या बँकांवर केली दंडात्मक कारवाई
RBI ने CSB आणि युनियन बँक ऑफ इंडिया वर दंडात्मक कारवाई केली आहे. CSB बँकेला तब्बल 1.86 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच युनियन बँक ऑफ इंडिया आला तब्बल 1.06 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
आरबीआयने याबाबत सविस्तर परिपत्रक निर्गमित केले आहे. सदर परिपत्रकानुसार, वित्तीय सेवांच्या आउटसोर्सिंगमधील जोखीम व्यवस्थापन आणि आचारसंहिता आणि शाखा अधिकृततेवर मास्टर सर्कुलेशनशी संबंधित काही निर्देशांचे पालन न केल्याने सीएसबी बँकेवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
तसेच केंद्रीय बँकेने आणखी एका निवेदनात म्हटले आहे की, युनियन बँक ऑफ इंडियाला नो युवर कस्टमर (KYC) शी संबंधित काही नियमांचे पालन न केल्याबद्दल आणि इतर कारणांमुळे दंड ठोठावण्यात आला आहे.
या दंडात्मक कारवाईमुळे दोन्ही बँकेच्या ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र ही कारवाई बँकांवर झाली असून याचा ग्राहकांवर कोणताच परिणाम होणार नाही. फक्त बँकेकडून दंड वसूल केला जाणार आहे ग्राहकांकडून दंड वसूल होणार नाही.