Banking News : बँकेत अकाउंट असणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. खरेतर अलीकडे कॅशलेस व्यवहाराला चालना मिळाली आहे. पैशांचे व्यवहार आता ऑनलाईन होत आहेत. यामुळे ग्राहकांचा मोठा वेळ वाचत आहे. पण पैशांचे व्यवहार करण्यासाठी बँकेत अकाउंट असणे आवश्यक असते. तुमचेही कोणत्या ना कोणत्या बँकेत अकॉउंट असणारच. दरम्यान, बँकेत खाते असणाऱ्या ग्राहकांसाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे.
विशेषता ज्या लोकांचे एकापेक्षा अधिक बँकेत खाते असेल अशा लोकांसाठी आजची बातमी खूपच कामाची ठरणार आहे. खरे तर अलीकडे सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय. व्हाट्सअप, इंस्टाग्राम, युट्युब सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चा वापर वाढला आहे.
याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या प्रकारची माहिती लोकांना उपलब्ध होते. मात्र सोशल मीडियावर असणारी सर्वच माहिती खरीच असते असे नाही. सोशल मीडियावर काही चुकीची माहिती देखील व्हायरल केली जात असते. यामुळे सर्वसामान्यांची फसवणूक होते.
परिणामी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या माहितीची खातरजमा करणे आवश्यक असते. सध्या अशीच एक माहिती सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात एकापेक्षा अधिक बँक अकाउंट असणाऱ्या ग्राहकांना आरबीआयकडून दंडित केले जाणार असल्याचे म्हटले गेले आहे.
यामुळे ज्या ग्राहकांकडे एकापेक्षा अधिक बँक अकाउंट आहेत त्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एकापेक्षा जास्त बँक अकाउंट्स असल्यास अशा ग्राहकांकडून दंड आकारण्यात येणार असा दावा सोशल मीडियावर केला जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे.
त्यामुळे सध्या याची मोठी चर्चा आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या गाइडलाइनचा हवाला दिला जात असल्याने लोकांमध्ये संभ्रमावस्था तयार झाली आहे. त्यामुळे खरंच आरबीआयने असा निर्णय घेतला आहे का, खरंच एकापेक्षा जास्तीचे बँक अकाउंट असल्यास RBI दंड वसूल करणार का असे प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत.
दरम्यान, आता भारत सरकारची प्रेस एजन्सी असलेल्या पीआयबी अर्थात प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने यासंदर्भात स्पष्टीकरण दिल आहे. पीआयबीने सोशल मीडियामध्ये केला जाणारा दावा निरर्थक असल्याचे म्हटले आहे. म्हणजे सोशियल मिडिया मध्ये जो दावा होत आहे तो साफ खोटा आहे.
ही एक अफवा आहे. यामुळे नागरिकांनी यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन जाणकार लोकांनी केले आहे. आरबीआयने एकापेक्षा जास्त बँक अकाउंट असल्यास दंड आकारावा असा कोणताच नियम बनवलेला नाही.