Banking News : भारतात अलीकडे ऑनलाइन व्यवहाराला मोठे प्राधान्य दाखवले जात आहे. पैशांचे व्यवहार आता ऑनलाइन होत असल्याने ग्राहकांचा मोठा वेळ वाचत आहे. फार कमी लोक आता कॅशचा वापर करून व्यवहार करत असल्याचे चित्र आहे. देशातील एक मोठा वर्ग आता पैशांचे व्यवहार ऑनलाईन करत असल्याने आधीच्या तुलनेत पैशांचे व्यवहार आता अधिक फास्ट आणि सोपे झाले आहेत.
मात्र ऑनलाइन पैशांचे व्यवहार जेवढे सोपे आहेत तेवढेच ते रिस्की देखील असतात. यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. मात्र अनेकजण अशी काळजी घेताना काही दिसत नाहीत. खरंतर अनेकजण एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड, फोन पे, पेटीएम, गुगल पे अशा वेगवेगळ्या अँप्लिकेशनचा पासवर्ड लक्षात असावा म्हणून फारच सोपा ठेवतात.
काहीजण तर हा पासवर्ड लक्षात राहावा म्हणून स्वतःची जन्मतारीखच पासवर्ड म्हणून सेट करतात. मात्र हे साफ चुकीचे आहे. कारण की यामुळे फसवणुकीची घटना होण्याची शक्यता बळावते.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या देशातील अनेक लोक एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड, फोन पे, पेटीएम, गुगल पे अशा वेगवेगळ्या अँप्लिकेशनचा पासवर्ड हा जन्मतारीख, वाहनाचा क्रमांक, जन्मवर्ष, लग्नाचे वर्षे, मुलाचे नाव, मुलांची जन्मतारीख किंवा पहिले नाव, जन्मवर्ष पासवर्ड म्हणून सेट करतात.
जर तुम्हीही असाच पासवर्ड सेट केला असेल तर आजची बातमी शेवटपर्यंत नक्कीच वाचा. तज्ञ सांगतात की, जे लोक अशा प्रकारचे पासवर्ड सेट करतात अशा लोकांची सायबर गुन्हेगारांच्या माध्यमातून लवकर फसवणूक केली जाते.
आतापर्यंत अशा अनेक लोकांच्या बँक खात्यातून सायबर गुन्हेगारांनी मोठी रक्कम लंपास केली आहे. यामुळे एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड, फोन पे, पेटीएम, गुगल पे अशा वेगवेगळ्या अँप्लिकेशनचा पासवर्ड हा स्ट्रॉंग असला पाहिजे.
म्हणून जर तुम्ही स्वतःची जन्मतारीख, मुलाची जन्मतारीख, कार किंवा दुचाकीचा क्रमांक, पहिले नाव आणि जन्मवर्ष, लग्नाचे वर्षे किंवा मुलाचे नाव पासवर्ड म्हणून सेट केले असेल तर आत्ताच हा पासवर्ड चेंज करून टाका. कारण की, असे पासवर्ड हॅक करणे सायबर गुन्हेगारासाठी अगदीच डाव्या हाताचा खेळ आहे.
सायबर गुन्हेगार तुमच्या समाजमाध्यमावरील जसे की फेसबूक, इंस्टाग्राम, व्हाट्सअँप, ट्विटर, स्नॅपचॅट, ट्विटरसारख्या ठिकाणाहून तुमची वैयक्तिक माहिती गोळा करतात. यात तुमचे नाव, गाडी क्रमांक, जन्मतारीख आणि अन्य कौटुंबिक माहिती गोळा केली जाते.
मग ही मंडळी तुमच्या पासवर्डचा शोध घेते. अशा परिस्थितीत जर तुम्ही सोपा पासवर्ड सेट केला असेल तर तो पासवर्ड सायबर गुन्हेगारांना लवकर सापडतो. मग काय ही मंडळी अवघ्या काही क्षणात तुमचे बँक अकाउंट रिकामे करू शकते. यामुळे तज्ञ लोकांनी किमान ८ ते १५ अक्षरे असलेला सुरक्षित पासवर्ड तयार करण्याचा सल्ला दिला आहे.
तुमच्या पासवर्ड मध्ये तुम्ही अंक, स्पेशल कॅरेक्टर्स आणि चिन्हे आणि अक्षरे यांचा समावेश केला पाहिजे. तुम्ही तुमचा पासवर्ड जेवढा स्ट्रॉंग ठेवाल तेवढीच तुमची फसवणूक होण्याची भीती कमी राहणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पासवर्ड स्ट्रॉंग असला तरी देखील तो वेळोवेळी बदलत राहायला हवे जेणेकरून पासवर्ड हॅक होणार नाही.