आर्थिक

बचत खात्यात मिनिमम बँक बॅलेन्स ठेवला नाही तर तुमची बँक किती चार्जेस वसूल करणार ?

Banking News : तुमचेही बँकेत बचत खाते आहे ना मग आजची ही बातमी तुमच्या कामाची आहे. खरं तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये एक बातमी वेगाने वायरल झाली होती. यात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल त्यांच्या ग्राहकांकडून सुमारे 8,495 कोटी रुपये वसूल केले असल्याचे म्हटले होते.

खरंतर देशातील बँकांचे मिनिमम बँक बॅलन्स मेंटेन करण्यासंदर्भातील नियम वेगवेगळे आहेत. देशातील काही बँका मिनिमम बँक बॅलन्स मेंटेन केला नाही तर कोणतेचं चार्ज वसूल करत नाहीत. पण बहुतांशी बँका आपल्या खातेधारकांकडून मिनिमम बँक बॅलन्स ठेवला नाही तर मोठी रक्कम वसूल करतात.

सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकेबाबत बोलायचं झालं तर एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आपल्या ग्राहकांकडून मिनिमम बॅंक बॅलन्स मेंटेन केले नाही तरी पैसे वसूल करत नाही. मात्र, इतर अनेक सरकारी बँका हे शुल्क आकारत आहेत.

यामध्ये पंजाब नॅशनल बँकेने गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक 1,538 कोटी रुपयांचा दंड वसूल केला असल्याची बातमी समोर आली आहे. अशा परिस्थितीत आज आपण मिनिमम बँक बॅलन्स ठेवण्यासाठी सध्या कोणती बँक किती शुल्क आकारत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणती बँक किती चार्जेस वसूल करते?

आयसीआयसीआय बँक : ही देशातील खाजगी क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक आहे. एचडीएफसी नंतर या बँकेचा नंबर लागतो. या बँकेत 5000 रुपये एवढी रक्कम किमान शिल्लक म्हणून ठेवावी लागते. जे ग्राहक हे राखण्यात अयशस्वी होतात त्यांना 100 रुपये + आवश्यक MAB मधील कमतरतेच्या 5% दंड आकारला जातो.

पंजाब नॅशनल बँक : ही देशातील एक प्रमुख सरकारी बँक आहे. ही बँक सुद्धा खात्यात किमान शिल्लक न ठेवल्यास दंड वसूल करते. हा दंड ग्रामीण भागासाठी 400 रुपये, निमशहरीसाठी 500 रुपये आणि शहरी/मेट्रो भागांसाठी 600 रुपये इतका ठरवला गेला आहे.

ॲक्सिस बँक : ॲक्सिस बँक ही खाजगी क्षेत्रातील एक मोठी बँक आहे. ही बँक खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवली नाही तर मेट्रो आणि शहरी भागात 600 ते 50 रुपये, सेबी अर्बनमध्ये 300 ते 50 रुपये आणि ग्रामीण भागात 150 ते 75 रुपये दंड आकारत आहे.
Yes Bank : येस बँक आपल्या ग्राहकांकडून किमान शिल्लक रक्कम खात्यात न ठेवल्यास कोणताच दंड वसूल करत नाही.

HDFC Bank : खाजगी क्षेत्रातील सर्वाधिक मोठी बँक म्हणजेच एचडीएफसी आपल्या ग्राहकांकडून खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यास दंड वसूल करते. ही बँक मेट्रो आणि शहरी भागात दहा हजार रुपये आणि सेमी अर्बन एरियामध्ये पाच हजार रुपये एवढी किमान शिल्लक रक्कम ठेवायला सांगते. जे ग्राहक किमान शिल्लक रक्कम मेंटेन करत नाहीत सरासरी शिल्लक रकमेच्या 6% कमी किंवा 600 रुपये (जे कमी असेल) तेवढा दंड वसूल करते.

SBI : एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच कौतुकास्पद निर्णय घेत असते. या बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल आणि तुम्ही किमान शिल्लक रक्कम तुमच्या खात्यात ठेवलेली नसेल तरी चिंता करण्याचे काहीही कारण नाही. कारण की ही बँक यासाठी तुमच्याकडून कोणताच दंड वसूल करणार नाही.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts