Banking News : बँक ग्राहकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी चेकने पेमेंट करणाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये चेक तसेच कॅश दोन्ही पद्धतीचे व्यवहार कमी झाले आहेत. आता ऑनलाईन पेमेंट मुळे अनेक गोष्टी सोप्या अन जलद झाल्या आहेत. ऑनलाइन पेमेंट साठी यूपीआय पेमेंट एप्लीकेशनचा उपयोग होत आहे.
गुगल पे, फोन पे, पेटीएम अशा यूपीआय पेमेंट एप्लीकेशनचा उपयोग करून सर्वसामान्यांना सहजतेने पैशांचा व्यवहार करता येत आहे. या एप्लीकेशन मुळे पैसे स्वीकारणे आणि पाठवणे खूपच सोपे झाले आहे. मात्र असे असले तरी आजही भारतातील एक मोठा वर्ग चेकने पेमेंट करत आहे. व्यापारी लोक नेहमीच चेकने पेमेंट करतात.
तसेच मोठी रक्कम असल्यास चेकने पेमेंट करण्यास पसंती दाखवली जाते. यामुळे चेकने पेमेंट करणाऱ्यांची संख्या कमी झाली असेल तरी देखील आजही महत्त्वाच्या अन मोठ्या कामासाठी चेकचा वापर होतो. रियल इस्टेट, शैक्षणिक संस्था, जमीन खरेदीचे व्यवहार, व्यवसाय अशा ठिकाणी आजही चेकचा अधिक वापर होत आहे.
दरम्यान, आज आरबीआयने चेकने पेमेंट करणाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे जर तुम्ही चेकने पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची ठरणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की सहा ऑगस्ट पासून आरबीआयची पतधोरण समितीची बैठक सुरू होती.
ही बैठक सहा ते आठ ऑगस्ट या दरम्यान संपन्न झाली आहे. केंद्राचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आरबीआयच्या पतधोरण समितीची ही पहिली-वहिली बैठक होती. यामुळे या बैठकीकडे अनेकांच्या नजरा होत्या. बैठकीत काय निर्णय घेतला जाणार याकडे अनेक जाणकार लोकांचे मोठे बारीक लक्ष होते.
या बैठकीत रेपो रेटमध्ये बदल होणार अशी शक्यता देखील वर्तवली जात होती. मात्र आरबीआयच्या या बैठकीत रेपो रेटमध्ये कोणताच बदल झालेला नाही. यावेळी देखील रेपो रेट कायम राहणार असा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र आज आरबीआयने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता चेकने पेमेंट करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता बँकेत चेक जमा झाल्यानंतर तो चेक झटपट क्लियर होणार आहे.
आतापर्यंत बँकेत चेक म्हणजेच धनादेश जमा केल्यानंतर तो चेक क्लिअर होण्यासाठी म्हणजे वटण्यासाठी दोन दिवसांची वाट पहावी लागत असे. आता मात्र चेक जमा केल्यानंतर अवघ्या काही तासात तो चेक क्लियर होणार आहे. म्हणजे चेकची रक्कम आता चेक जमा केल्यानंतर अवघ्या काही तासांनी थेट खात्यात जमा होणार आहे.
त्यामुळे पैशांच्या व्यवहाराला चालना मिळणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे चेक देणाऱ्यांना आणि स्वीकारणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून चेकने पेमेंट करनेही आता ऑनलाईन पेमेंट प्रमाणेचं सुपरफास्ट होणार आहे.