Banking Rule:- सध्या जर आपण पैशांचे व्यवहार पाहिले तर ते आता ऑनलाईन पद्धतीने मोठ्या प्रमाणावर केले जातात. गेल्या काही वर्षापासून रोखीने व्यवहार करण्याचे प्रमाण खूप कमी झाले असून त्यामानाने ऑनलाइन ट्रांजेक्शनचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
याकरिता पेटीएम तसेच गुगल पे व फोन पे सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. एखादी छोटी मोठी वस्तू जरी खरेदी करायची असेल तरी देखील आपण ते ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठवतो. परंतु या ऑनलाइन पेमेंट करण्याच्या पद्धतीमुळे बऱ्याचदा आपल्याला ज्या व्यक्तीला पैसे ट्रान्सफर करायचे असतात
ते चुकून ज्या खात्यात पाठवायचे त्याकडे न जाता दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात पाठवले जातात. यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास होतो. कित्येक जणांना हे पैसे परत मिळतील की नाही किंवा मिळतील तर कसे मिळवायचे? याबद्दल पुरेशी माहिती नसते. याबाबत बँकेचे काही नियम आहेत व ते आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने या लेखात आपण बँकेचे नेमके काय नियम आहेत? याबद्दलची माहिती घेऊ.
चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले तर काय करावे?
समजा तुमच्याकडून चुकीने ज्या खात्यात पैसे पाठवायचे त्याऐवजी दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले तर सगळ्यात अगोदर तुम्ही तुमचे ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेत जाऊन संबंधित अधिकाऱ्याला या सगळ्या व्यवहाराची माहिती तपशीलवार द्यावी. एवढेच नाही तर झालेल्या या व्यवहाराचे सर्व पुरावे द्यावे.
यामुळे बँकेकडून यावर पटकन कारवाई केली जाते. तुमच्याकडून ज्या खात्यात चुकीने पैसे ट्रान्सफर केले गेले आहेत ते खाते जर तुमची जी बँक आहे त्या बँकेचेच असेल तर बँक या प्रकरणांमध्ये मध्यस्थी म्हणून काम करते. ज्या व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये चुकून पैसे ट्रान्सफर झाले आहेत त्या व्यक्तीशी बँक संपर्क साधते व संवाद देखील साधते किंवा ईमेल करते. त्यानंतर त्या खातेदाराची परवानगी घेऊन बँक सात दिवसाच्या आत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे परत करते.
ही माहिती देखील तुम्हाला असणे गरजेचे
समजा तुम्ही ज्या व्यक्तीच्या खात्यामध्ये चुकीने पैसे ट्रान्सफर केले आहेत आणि त्या व्यक्तीने जर ते पैसे परत करायला नकार दिला तर तुम्ही त्या खातेदाराच्या नावावर एफआयआर दाखल करू शकतात. म्हणजेच तुम्हाला अशा प्रकरणांमध्ये कायदेशीर मदत घेणे गरजेचे असते
व अशा कायदेशीर प्रक्रियेच्या माध्यमातून तुम्ही तुमचे पैसे परत मिळू शकतात. परंतु ज्या खातेदाराच्या खात्यात चुकून पैसे गेले आहेत तो तुमच्याशी संवाद साधत असेल किंवा तुमच्या संपर्कात असेल आणि तुमचे पैसे परत करण्यासाठी तो सहमत असेल तर अशाप्रसंगी बँक तुम्हाला काही कागदपत्रांच्या प्रती सबमिट करायला सांगू शकते.
अशा पद्धतीने तुम्ही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने चुकीच्या खात्यात गेलेले पैसे परत मिळवू शकतात.