Banking Rule:- बँकिंग प्रणाली ही आपल्या जीवनाशी निगडित असलेली प्रणाली असून बँकिंग प्रणालीचे अनेक वेगवेगळे नियम असतात व ते रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून अमलात आणले जातात. त्यामुळे आपल्याला बँकेच्या संबंधित कुठलेही काम करायचे असेल तर ते नियमात राहून करणे गरजेचे असते.
आज-काल बँकिंग व्यवस्था संपूर्णपणे डिजिटल झाली असून बहुतेक कामे आता ऑनलाईन पद्धतीने केले जातात. तुम्हाला तुमच्या बँकेकडे चेक बुक किंवा एटीएम कार्ड साठी अर्ज करायचा असेल तरीदेखील तुम्ही घरबसल्या आता ऑनलाईन पद्धतीने ही कामे करू शकतात.
यासंबंधी कुठलेही काम करताना तुम्हाला नियमाच्या चौकटीत राहून करणे गरजेचे असते. याच अनुषंगाने बऱ्याचदा कुटुंबातील एखाद्या सदस्याचा मृत्यू होतो व त्यानंतर मात्र संबंधित व्यक्तीच्या बँक खात्याशी संबंधित अनेक कामे आपल्याला करणे गरजेचे असते.
यामध्ये त्या व्यक्तीचे खाते बंद करायचे किंवा त्याच्या एटीएम कार्डचे काय करायचं? अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात. यासंबंधी रिझर्व बँकेने काही नियम घालून दिलेले आहेत व ते नियम काय आहेत याबद्दलचीच माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
मृत व्यक्तीच्या बँक खात्याचे काय करायचे?
सगळ्यात महत्वाचे म्हणजे एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर त्याचे बँक खाते लवकरात लवकर बंद करणे खूप गरजेचे असते. याबाबत रिझर्व बँकेने काही निर्देश दिलेले आहेत. यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही मृत झालेल्या व्यक्तीच्या बँक खात्यातून तुम्ही एटीएमचा वापर करून पैसे काढू शकत नाही व तसे केले तर ते बेकायदेशीर आहे.
बऱ्याचदा कुटुंबातील एकमेव कमावती सदस्य व्यक्ती जर मृत पावली तर अशा व्यक्तींचा गुंतवणूक किंवा बचत खात्यांची माहिती कुटुंबातील इतर सदस्यांना कमीत कमी असते किंवा माहिती नसते.
परंतु जर काही मूलभूत माहिती सदस्यांकडे असेल तर मात्र अशा व्यक्तींच्या बँक खात्यांचा तपशील मिळणे सोपे होते. म्हणजेच मृत झालेल्या व्यक्तीच्या बँक खात्याचा तपशील माहिती असेल तर पैसे मिळणे सोपे जाते. तसेच जर एटीएम कार्डचा पिन माहिती असेल तर पैसे काढू शकतो. नाहीतर बँकेकडे जाऊ शकतो.
नॉमिनी अथवा वारस पैशावर दावा करू शकतो का?
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची जी काही मालमत्ता असेल ती आपल्या नावावर हस्तांतरित केल्यानंतरच तुम्ही त्या व्यक्तीच्या बँक खात्यातून पैसे काढू शकतात. यासंबंधी कायद्यानुसार पाहिले तर कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर तुम्ही त्याच्या खात्यातून एटीएम चा वापर करून पैसे काढू शकत नाही
व ते कायदेशीर देखील नाही. याकरिता तुम्हाला सर्वप्रथम बँकेला कळवावे लागेल की खातेधारकाचा मृत्यू झाला आहे व तुमची नॉमिनीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच तुम्ही अशा व्यक्तीच्या खात्यातून पैसे काढू शकतात. परंतु यामध्ये जर एकापेक्षा जास्त व्यक्ती नॉमिनी असतील तर सर्व नॉमिनींचे संमती पत्र बँकेला दाखवावे लागेल
तरच तुम्हाला खात्यातून पैसे काढता येतात. अशा प्रकरणांमध्ये मृत झालेल्या व्यक्तीचा नॉमिनी त्या व्यक्तीच्या बँक खात्यातील पैशांवर दावा करू शकतो. यासाठी तुम्हाला बँकेमध्ये जाऊन त्यासंबंधीचा क्लेम फॉर्म भरावा लागतो. या फॉर्म सोबत बँकेचे पासबुक, एटीएम तसेच चेक बुक, मृत्यू झालेल्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र आणि आधार कार्ड, विज बिल आणि पॅन कार्ड इत्यादी कागदपत्र देणे बंधनकारक असते. त्यानंतर बँकेच्या माध्यमातून तुम्हाला सहजपणे पैसे मिळू शकतात.
मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या बँक खात्याला वारस नसेल तर
समजा मृत झालेल्या व्यक्तीच्या बँक खात्यात कोणत्याही प्रकारचे वारस किंवा नॉमिनेशन केले नसेल तर खात्यातील पैसे सर्व वारसांमध्ये सारख्या प्रमाणामध्ये वाटले जातात.परंतु याकरिता सर्व वारसांना त्यांचे उत्तराधिकारी प्रमाणपत्र दाखवणे गरजेचे असते.
त्यानंतर बँकेमध्ये फॉर्म भरताना त्या मृत झालेल्या व्यक्तीचे बँक खाते पासबुक, खात्याचा टीडीआर तसेच एटीएम, पासबुक आणि मृत्यू प्रमाणपत्र देणे गरजेचे असते. तसेच प्रत्येक वारसांना त्यांचे ओळखपत्र देखील दाखवावे लागते. ही व यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या खात्यात जमा असलेले पैसे कायदेशीरदृष्ट्या जे वारस आहेत त्यांना दिले जातात.