Financial Year Closing 31 March 2024 : आज रविवारी देशातील सर्व बँका सार्वजनिक व्यवहारासाठी खुल्या राहणार आहेत, असे आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून देण्यात आले आहेत. यावेळी 31 मार्च 2024 रोजी आर्थिक वर्ष बंद होत असल्याने, RBI आणि भारत सरकारने बँकांना 31 मार्च रोजी बँका उघड्या ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आज बँका सुरू राहतील, सामान्य लोक त्यांच्या काही कामांसाठीच बँकांकडे जाऊ शकतात.
चालू आर्थिक वर्ष 2023-24 आज, रविवार, 31 मार्च 2024 रोजी संपणार आहे. म्हणूनच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सरकारी व्यवहारात गुंतलेल्या सर्व एजन्सी बँकांना 31 मार्च 2024 रोजी वीकेंडला देखील बँका खुल्या ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बँका खुल्या ठेवण्याच्या मध्यवर्ती बँकेच्या निर्णयावरून असे सूचित होते की आयकर रिटर्न भरण्याची किंवा इतर पेमेंट करू इच्छिणाऱ्या व्यक्ती रविवारीही बँकेच्या शाखेत जाऊन ते काम पूर्ण करू शकतात.
RBI च्या अधिसूचनेनुसार, एकूण 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँका तसेच 20 खाजगी क्षेत्रातील बँका आणि एक विदेशी बँक या यादीत समाविष्ट आहेत. भारत सरकारने आर्थिक वर्ष 2023 मधील पावत्या आणि पेमेंटशी संबंधित सर्व सरकारी व्यवहारांसाठी 31 मार्च 2024 (रविवार) रोजी बँकांच्या सर्व शाखा उघड्या ठेवण्याची विनंती केली आहे.
कोणत्या बँका खुल्या राहतील?
सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया (BOI), बँक ऑफ बडोदा (BoB), बँक ऑफ महाराष्ट्र, युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, लिमिटेड, ICICI बँक लिमिटेड, जम्मू आणि काश्मीर बँक लिमिटेड, कर्नाटक बँक लिमिटेड, कॅनरा बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक (IOB), पंजाब आणि सिंध बँक (PSB), पंजाब नॅशनल बँक (PNB), स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), ॲक्सिस बँक लिमिटेड, सिटी युनियन बँक लिमिटेड, DCB बँक लिमिटेड,
फेडरल बँक लिमिटेड, IDBI बँक लिमिटेड, IDFC फर्स्ट बँक लिमिटेड, इंडसइंड बँक लिमिटेड, करूर वैश्य बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक लिमिटेड, आरबीएल बँक लिमिटेड, साउथ इंडियन बँक लिमिटेड, येस बँक लिमिटेड, धनलक्ष्मी बँक लिमिटेड, बंधन बँक लिमिटेड, सीएसबी बँक लिमिटेड, तामिळनाड मर्कंटाइल बँक लिमिटेड, डीबीएस बँक इंडिया लिमिटेड.