आर्थिक

Become Rich Tips: दररोज 15 ते 20 रुपयांची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्याधीश! कसं ते एकदा वाचाच?

Become Rich Tips:- सध्या तुम्ही किती कमवता यापेक्षा तुम्ही जे काही कमावता त्याची बचत कशी करता या गोष्टीला खूप महत्त्व आहे. नाहीतर कितीही पैसा कमावून जर उधळपट्टी सुरू ठेवली तर मात्र  हातात एक रुपया देखील राहत नाही व कायम व्यक्ती आर्थिक संकटातच असतो.

त्यामुळे आपण जे काही कमवतो त्यातील पैशांची योग्य ठिकाणी बचत करणे खूप गरजेचे असते. भविष्यातील आर्थिक सक्षमतेच्या दृष्टिकोनातून आज केलेली बचत ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरते. तुम्ही जे काही कमावता त्यामधून तुम्ही अगदी छोटीशी रक्कम बचत केली तरी देखील तुम्ही लखपती होऊ शकतात.

फक्त यामध्ये तुम्हाला बचतीत सातत्य ठेवणे गरजेचे असते. अशा प्रकारच्या छोट्या छोट्या बचतीतून तुम्ही लाखो रुपये कसे जमवू शकतात याबद्दलच्या अनेक कल्पना किंवा मार्ग आहेत.अशा मार्गांचा वापर करून तुम्ही श्रीमंत बनू शकता. याकरिता तुम्ही एक आर्थिक उद्दिष्ट ठेवून छोट्या रकमेतून गुंतवणूक सुरू करू शकतात. त्यामध्ये तुमची गुंतवणुकीची पद्धत आणि कालावधी हा दीर्घ असणे खूप गरजेचे आहे. काही वर्षानंतर तुम्हाला या माध्यमातून चांगला पैसा मिळू शकतो.

 दररोज 15 ते 20 रुपयांची बचत बनवू शकते तुम्हाला करोडपती

दीर्घ कालावधी करिता जर तुम्ही प्रत्येक दिवसाला दहा रुपयांची बचत केली तर एका महिन्यामध्ये तुम्ही तीनशे रुपये जमा करू शकतात. याच तीनशे रुपयांची गुंतवणूक तुम्ही म्युच्युअल फंडाच्या  एसआयपीत केली तर तुम्ही माध्यमातून चांगला फंड मिळवू शकतात.

समजा तुम्ही 35 वर्षांकरिता जर तीनशे रुपये प्रत्येक महिन्याला एसआयपी केली तर तुम्हाला यावर 18% परतावा जर मिळाला 35 वर्षानंतर तुम्ही 1.1 कोटी रुपयांचा परतावा या माध्यमातून मिळवू शकतात. ज्या व्यक्तीला महिन्याला वीस ते पंचवीस हजार रुपये पगार आहे किंवा वीस ते पंचवीस हजार कमावणारा व्यक्ती देखील सहजपणे या माध्यमातून करोडपती होऊ शकतो.

मॅच्युअल फंडामध्ये तुम्ही पाचशे रुपयांपासून देखील गुंतवणूक करू शकतात. दर महिन्याला एक हजार ते दोन हजार रुपयांची दीर्घ कालावधी करिता बचत करून गुंतवणूक केली तर वर्षानंतर तुम्ही सहजपणे या माध्यमातून करोडपती होऊ शकतात. प्रत्येक महिन्याला तुम्हाला न चुकता एसआयपीमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे राहिल. यामध्ये जसजसे तुमचे उत्पन्न किंवा पगार वाढेल तसतशी जर तुम्ही गुंतवणूक वाढवत गेला तर फायदा मिळतो.

 कोणत्या वयापासून गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल?

गुंतवणूक कोणत्या वयात सुरु करावी ही गोष्ट देखील तितकेच महत्त्वाची आहे. जितक्या कमीत कमी वयामध्ये तुम्ही गुंतवणूक सुरू कराल तितका जास्तीत जास्त फायदा तुम्हाला मिळेल.

समजा वीस वर्षाच्या वयामध्ये तुम्ही 30 रुपयांची एसआयपी करायला सुरुवात केली तर तुम्ही साठ वर्षानंतर 12% व्याजाने एक कोटी सात लाख रुपयांचा परतावा मिळवू शकता. परंतु वय जर तुमचे 40 च्या पुढे असेल तर तुम्ही प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपयांची एसआयपी केली तर साठ वर्षानंतर जवळपास एक कोटींच्या आसपास तुम्हाला परतावा मिळवू शकता.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts