आर्थिक

Beer Bar Licence: बियर बारचा व्यवसाय कसा सुरू करावा? कसे काढावे लागते लायसन्स व किती येतो खर्च? वाचा ए टू झेड माहिती

Beer Bar Licence:- व्यवसाय म्हटले म्हणजे यामध्ये अनेक छोटे-मोठे व्यवसायांचा समावेश आपल्याला करता येतो. यामध्ये काही व्यवसायांना लागणारा पैसा किंवा गुंतवणूक ही कमीत कमी लागते तर काही व्यवसायांसाठी मात्र प्रचंड प्रमाणात गुंतवणूक करावी लागते.

परंतु अशा व्यवसायांमधून मिळणारा नफा देखील जास्त असतो हे देखील तेवढेच सत्य आहे. दुसरे महत्त्वाची बाब म्हणजे सध्या नोकऱ्याची उपलब्धता खूपच कमी असल्यामुळे बरेच तरुण आता व्यवसायांकडे वळत असताना आपल्याला दिसून येत आहेत. त्यामुळे व्यवसायाकडे येत असताना सगळ्यात अगोदर विचार येतो तो व्यवसाय कोणता करावा आणि त्यासाठी लागणारी गुंतवणूक इत्यादींचा.

यामध्ये बऱ्याच जणांना बियर बार सारख्या व्यवसायात उतरण्याची इच्छा असते. हा व्यवसाय 50 टक्के नफा देणारा निश्चित असा व्यवसाय म्हटला जातो. बियर बार व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला आवश्यक परवाना काढणे खूप गरजेचे असते. यामध्ये बऱ्याच जणांना हा परवाना कसा काढतात किंवा हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान किती खर्च अपेक्षित असतो? त्याबद्दल माहिती नसते. त्यामुळे या लेखात आपण याविषयीची संपूर्ण माहिती घेणार आहोत.

 बिअरबार व्यवसाय मधील संधी

सध्या या व्यवसायाचा ट्रेंड खूप जास्त असून कोणत्याही प्रकारची पार्टी असो किंवा एखादा स्पेशल दिवस साजरा करायचा असेल तर मोठ्या प्रमाणावर बिअर बारमध्ये लोकांना जायला आवडते. परंतु या व्यवसायाचे एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला हा व्यवसाय अशा राज्यामध्ये सुरू करता येतो ज्या ठिकाणी याला त्या ठिकाणच्या सरकारने मान्यता दिलेली आहे.

कारण आपल्याला माहित आहेस की भारतामध्ये अनेक राज्यात दारू विक्री आणि खरेदीवर देखील बंदी आहे. अशा ठिकाणी तुमच्याकडे वैध परवाना असणे खूप गरजेचे आहे.

वैध परवान्याशिवाय तुम्ही अल्कोहोलयुक्त पेय जर विकले तर ते कायद्याने दंडणीय अपराध आहे. त्यामुळे तुम्हाला बियरबार व्यवसाय करिता परवाना आवश्यक असतो व तुम्हाला तो राज्य सरकारच्या एक्साईज डिपार्टमेंटकडे अर्ज करून मिळवता येतो. या डिपार्टमेंटच्या माध्यमातून अर्जाची पडताळणी केली जाते व वाईन शॉपचे परवाने दिले जातात.

 परवान्यासाठी काय करावे लागते?

याकरिता तुम्हाला एक्साईज डिपार्टमेंटकडे अर्ज करणे आवश्यक असते व त्याकरिता सगळ्यात अगोदर तुम्हाला दहा रुपये किमतीचा कोर्टाचा स्टॅम्प घ्यावा लागतो व त्यानंतर तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या एक्साईज ऑफिसमध्ये जावे लागते. जर तुमच्या जिल्ह्यामध्ये एक्साईज ऑफिस नसेल तर तुम्ही या संबंधीची चौकशी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करून पर्यायी ऑफिसची माहिती मिळवू शकतात.

यासाठी एक ॲप्लिकेशन फॉर्म घ्यायचा असतो व तो तुम्हाला मोफत मिळतो. या फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचुक रीतीने  भरावी लागते. तसेच या फॉर्ममध्ये भरलेल्या माहितीनुसार आवश्यक कागदपत्रे तुमच्या जवळ असणे गरजेचे असते. त्यानंतर खरेदी केलेल्या स्टॅम्प पेपरवर एप्लीकेशन फॉर्म चिटकवून हा फॉर्म तसेच फोटो

आणि ऍड्रेस प्रूफ साठीच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स या ऑफिसमध्ये तुम्हाला सबमिट करावे लागतात. तुम्ही एप्लीकेशन दिल्यानंतर त्याची पडताळणी होते व पडताळणी झाल्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून परवाना तुम्हाला दिला जातो. अशा पद्धतीने साधारणपणे तुम्ही बिअरबार व्यवसायाचा परवाना काढू शकतात.

 बियरबार व्यवसायासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी

या व्यवसायासाठी तुम्हाला जागा, आवश्यक मशीन तसेच गुंतवणूक, कामगार तसेच जीएसटी क्रमांक आणि मार्केटिंग सारख्या गोष्टींवर लक्ष द्यावे लागते. जागेचा विचार केला तर बिअरबार व्यवसाय करिता तुम्हाला किमान 800 ते 1000 स्क्वेअर फुट इतकी जागा लागते.

मशिनरीचा विचार केला तर तुम्हाला यामध्ये बियर ठेवण्यासाठी फक्त रेफ्रिजरेटरची गरज भासते. लागणाऱ्या भांडवलाचा विचार केला तर तुम्हाला या व्यवसायाकरिता कमाल 15 ते 20 लाख रुपये इतके तरी गुंतवणूक करणे गरजेचे असते.

तसेच कर्मचारी सुद्धा या व्यवसायात लागतात. जसे मॅनेजर पासून वेटर, डिश वॉशर, स्टोअर कीपर इत्यादी कामांसाठी तुम्हाला कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. कर्मचारी ठेवताना त्यांचे वेतन व त्यांचा अनुभव इत्यादी गोष्टी तुम्ही समोर ठेवून कर्मचाऱ्यांची निवड करणे गरजेचे असते.

अशा पद्धतीने तुम्ही बिअरबार व्यवसाय सुरू करू शकता.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts