आर्थिक

होमलोन घेतल्यावर मिळतात लाखो रुपयांचे फायदे! 99% लोकांना माहितीच नाही

Home Loan Benefit:- प्रत्येकाला स्वतःचे घर असावे अशी इच्छा असते.स्वतःच्या घराची इच्छा किंवा स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. परंतु घराच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे प्रत्येकालाच घर घेणे शक्य होत नाही व त्यामुळे बरेचजण घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी होमलोनचा आधार घेतात.

होमलोन घेऊन त्या माध्यमातून घराची खरेदी केली जाते किंवा घर बांधले जाते. अशाप्रकारे होमलोन स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व्यक्तीला मदत करत असते. परंतु याच होमलोनचे याव्यतिरिक्त अनेक फायदे मिळतात ते नक्कीच कर्जदारासाठी म्हणजेच ग्राहकासाठी फायद्याचे ठरतात.

होमलोन घेतल्यावर मिळतात हे फायदे

1- ग्राहकांसाठी असते फायद्याचे कर्ज- होमलोनचा सगळ्यात पहिला फायदा म्हणजे ते ग्राहक अनुकूल कर्ज असते व इतर कर्जाच्या तुलनेमध्ये ते स्वस्त असते. या कर्जाच्या परतफेडच्या अटी देखील सोप्या असतात आणि ग्राहकाला कर्जाचे प्री पेमेंट किंवा फोरक्लोज करण्याची सुविधा मिळते.

तसेच भविष्यामध्ये त्याचे व्याजदर कमी करून हे लोन अधिक आकर्षक आणि परवडण्याजोगे करता येऊ शकते असं तज्ञांचे मत आहे.

अशा परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःची बचत वापरून घर घेऊन बचत कमी करण्यापेक्षा चांगल्या व्याजदराने होम लोन घेऊन घर घेणे कधीही फायद्याचे ठरते. सेवानिवृत्ती निधी करिता आणि भविष्यातील इतर गरजांकरिता तुमची बचत बाजूला ठेवता येणे शक्य होते व त्यामुळेच बरेच लोक स्वतःकडे पैसे असून देखील होमलोन घेऊन घर घेतात.

2- कर सवलत किंवा करावर बचत- होमलोन वरील सगळ्यात महत्त्वाचा आणि दुसरा मोठा फायदा म्हणजे इन्कम टॅक्स सवलत होय. होम लोनच्या मदतीने तुम्ही प्रत्येक वर्षाला लाखो रुपयांचा टॅक्स वाचवू शकतात. सध्याच्या नियमानुसार बघितले तर प्राप्तिकर कायद्याच्या कलम 24(b) अंतर्गत व्याज भरण्यावर प्रत्येक आर्थिक वर्षात दोन लाख रुपयांची सूट यामध्ये उपलब्ध आहे.

तसेच मूळ रकमेच्या परतफेडीवर कलम 80C अंतर्गत दीड लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध आहे. असेच तुम्ही सह अर्जदाराच्या मदतीने गृह कर्ज घेतले असेल तर दोन्ही अर्जदार वेगवेगळ्या कर सवलतीचा लाभ घेऊ शकतात आणि एकूण सात लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकतात.

3- मालमत्तेचे टायटल क्लियर असल्याची हमी- होमलोन अप्रूव्हल करण्यापूर्वी प्रत्येक बँक संबंधित मालमत्तेचे टायटल आणि रेकॉर्ड तपासतात व मालमत्तेच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा वाद नाही हे या माध्यमातून तपासले जाते.

सर्व आवश्यक कागदपत्रे कायदेशीर पडताळणी द्वारे पडताळली जातात व त्यामुळे मालमत्ता इतर कोणाच्याही ताब्यात नाही याची खात्री होते. त्यामुळे घर खरेदी करणाऱ्याला खात्री मिळते की तो जे घर घेत आहे त्या घरासंबंधी किंवा प्रॉपर्टी संबंधी कुठल्याही प्रकारचा विवाद नाही व तिचे टायटल क्लिअर आहे.

4- टॉप अप कर्ज सुविधा- तुम्ही होमलोन वर टॉप-अप लोनचा लाभ घेऊ शकतात. टॉप अप होमलोन हे एक प्रकारचे पर्सनल लोन आहे व जे तुम्हाला कमी व्याजदरात मिळते. टॉप अप होम लोनची परतफेड करण्यासाठी तुम्हाला चांगला वेळ देखील मिळतो.

कारण या टॉपअप लोनचा परतफेडीचा कालावधी तुमच्या होमलोनच्या परतफेडच्या कालावधीवर अवलंबून असतो. तसेच अशा प्रकारच्या टॉप अप लोन वर कुठल्याही प्रकारचे छुपे चार्जेस लागत नाहीत.

जर तुम्ही अर्ध सुसज्ज किंवा जुनी अपार्टमेंट खरेदी केले असेल तर तुम्ही तुमच्या गृहकर्जावर त्याच्या अंतर्गत किंवा नूतनीकरणासाठी सहजपणे टॉप अप कर्जाची सुविधा होम लोनच्या माध्यमातून घेऊ शकतात.

5- महिला सह अर्जदार असेल तर मिळतात अनेक फायदे- होमलोन घेताना संयुक्त कर्जाची सुविधा उपलब्ध आहे व जर होमलोन करिता सह अर्जदार महिला असेल तर तुम्हाला थोड्या स्वस्त व्याजदरात कर्ज मिळते व महिला सह अर्जदार असल्यास सर्व बँका साधारणपणे 0.50 टक्क्यांपर्यंत कमी व्याजदराने कर्ज देतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts