आर्थिक

Best 5 Stocks : गुंतवणूकदार होणार मालामाल! 100 रुपयांच्या आतील हे 5 स्टॉक्स देतील बंपर नफा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला

Best 5 Stocks : आजकाल अनेकजण गुंतवणुकीचे योग्य मार्ग शोधत आहेत. तसेच प्रत्येकजण त्याच्या सोयीनुसार सरकारी आणि खाजगी योजनांमध्ये गुंतवणूक करत आहे. तुम्हालाही गुंतवणूक करायची असेल तर शेअर बाजारातील गुंतवणूक तुम्हाला येत्या काळात बंपर नफा कमवून देऊ शकते.

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला त्याच्या काही मूलभूत गोष्टींबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला शेअर बाजाराबद्दल माहिती नसेल तर तुम्ही शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने शेअर बाजारात गुंतवणूक करू शकता.

तुम्हीही शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास इच्छुक असाल तर तज्ज्ञांकडून असे काही ५ शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे जे येत्या काळात गुंतवणूकदारांना मालामाल करू शकतात. चला तर जाणून घेऊया या शेअर्सबद्दल…

1- Punjab National Bank

तुम्हालाही शेअर बाजारात गुंतवणूक करून चांगला नफा कमवायचा असेल तर तुम्ही ब्रोकरेज फर्म शेअरखानने सुचवण्यात आलेल्या पंजाब नॅशनल बँकेचे शेअर्समध्ये गुंतवणूक करून चांगला नफा कमवू शकता. सध्या हा शेअर्स 59.65 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर या शेअरसाठी 102 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे.

2- Indian Oil Corporation Ltd

ब्रोकरेज फर्म नुवामाने इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे हा शेअर खरेदी करून तुम्ही चांगला नफा कमवू शकता. हा शेअर सध्या 93.70 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर या शेअरसाठी 115 चे टार्गेट देण्यात आले आहे.

3- Equitas Small Finance Bank Ltd

ब्रोकरेज फर्म HSBC ने Equitas Small Finance चे स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीचे शेअर्स तुम्हाला येत्या काळात चांगला नफा देऊ शकतात. सध्या हा शेअर्स 89.80 रुपयांवर ट्रेडिंग करत आहे. तर या शेअर्ससाठी 121 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे.

4- Bank of India Ltd

गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर ब्रोकरेज फर्म शेअरखानने सुचवलेल्या बँक ऑफ इंडियाच्या स्टॉकमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. या शेअरसाठी 102 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे. सध्या हा शेअर 84.38 ऋयानावर ट्रेडिंग करत आहे.

5- Motherson Sumi Wiring India Ltd

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने सुचवलेल्या मदरसन सुमी वायरिंगच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करून तुम्ही मालामाल होऊ शकतो. सध्या हा शेअर 59.55 रुपयांवर ट्रेडिंग करत आहे. तसेच या शेअर्ससाठी 70 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts