Best Investment Plans : लोकांना बचत करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक सरकारी योजना राबवल्या जातात. यापैकी एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. ज्यामध्ये दररोज फक्त तीनशे रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही काही वर्षांत लाखो रुपयांचा निधी जमा करू शकता.
ही योजना विशेषतः मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे. मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. ज्यामध्ये पालक सुकन्या समृद्धी योजनेत मुलीच्या नावाने खाते उघडू शकतात. या योजनेअंतर्गत फक्त दोन मुलींच्या नावाने खाते उघडता येते. मात्र जुळ्या मुलांच्या बाबतीत तीन मुलींच्या नावानेही खाते उघडता येते.
सरकारकडून सुरु केलेल्या सुकन्या समृद्धी खात्यांमध्ये दरवर्षी जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. जर तुम्ही दरवर्षी 1.5 लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर तुम्ही 67.3 लाख रुपयांची बचत आरामात करू शकता. यामध्ये तुम्हाला ८ टक्के व्याज मिळू शकते. १५ वर्षांनंतर मॅच्युरिटीवर तुम्हाला ६७.३ लाख रुपये मिळतील.
दरम्यान, व्याजदरात मोठी वाढ झाली तर मिळणारा पैसाही वाढेल. पन्नास लाख रुपयांचा निधी तयार करण्यासाठी तुम्ही दररोज ३०५ रुपये म्हणजेच दरवर्षी १,११,३७० रुपये जमा करून चांगली रक्कम जमा करू शकता. यासाठी तुम्हाला 15 वर्षांसाठी पैसे जमा करावे लागतील. ज्यामध्ये 8 टक्के व्याजदराने, तुम्ही मॅच्युरिटीवर 50 लाख रुपयांचे मालक व्हाल.
नियम काय आहे?
मुलीच्या जन्मानंतर, पालक तिच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकतात. त्यातून मिळालेली रक्कम मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी वापरली जाऊ शकते. या योजनेत ८ टक्के दराने व्याज दिले जाते. यावर मिळणारे व्याज चक्रवाढ व्याजाच्या आधारे मिळते. जेव्हाही खाते उघडले जाते तेव्हा खाते 21 वर्षांनी परिपक्व होते. येथे तुम्हाला 15 वर्षे सतत गुंतवणूक करावी लागेल.