आर्थिक

Best Investment Schemes : SCSS की ज्येष्ठ नागरिक FD? कोठे मिळेल तुम्हाला सर्वात जास्त परतावा, जाणून घ्या एकाच क्लिकवर

Best Investment Schemes : प्रत्येकाला निवृत्तीनंतर आपल्याला पुढील आयुष्यात पैशाची अडचण येऊ नये याची जास्त काळजी असते. त्यामुळे आतापासूनच नोकरीसोबतच निवृत्तीची तयारी करणे खूप गरजेचे आहे. सध्या अनेक गुंतवणूक योजना आहेत.

जोखीम नसणाऱ्या आणि सर्वात जास्त परतावा मिळण्यासाठी अनेकजण SCSS आणि ज्येष्ठ नागरिक FD मध्ये गुंतवणूक करतात. परंतु या दोन योजनांपैकी सर्वात जास्त परतावा देणारी योजना कोणती असा प्रश्न अनेकांना पडतो. जर तुम्हालाही असा प्रश पडत असेल तर जाणून घेऊयात याचे उत्तर.

खरंतर ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवानिवृत्ती लाभ योजना आहे. या अंतर्गत 60 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे लोक एकरकमी रक्कम गुंतवून चांगला परतावा मिळवतात. त्या तुलनेत वरिष्ठ नागरिक मुदत ठेवी अंतर्गत चांगला व्याजदर देतात. तसेच, दोन्ही योजनांचे फायदे वेगवेगळे आहेत. अशा परिस्थितीत, फायदे जाणून घेऊन तुम्ही तुमच्यासाठी कोणती योजना सर्वात चांगली आहे हे ठरवू शकता.

तसेच SCSS ला सुरक्षित गुंतवणूक योजना म्हणूनही ओळखण्यात येते. ही योजना 5 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीसह येत आहे. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मुदतपूर्तीपूर्वीच ती आणखी तीन वर्षे वाढवू शकता. तसेच तुम्ही देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन त्याचे खाते चालू करू शकता. ग्राहकही त्यांचे SCSS खाते देशातील कोणत्याही शाखेत ट्रान्सफर करू शकतात.

यात कमीत कमी एक हजार रुपये आगाऊ जमा करावे लागू शकतात. यानंतर, तुम्ही इच्छित असाल तर, तुम्ही 1000 रुपयांच्या पुढे कोणतीही रक्कम वाढवू शकता. या योजनेशी निगडित लोकांना प्राप्तिकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलत देखील मिळते.

  • सामान्य एफडीच्या तुलनेमध्ये बँक ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याज देते. या योजनेत साधारणत: ज्येष्ठ नागरिकांना बँकेकडून 0.5 टक्के जास्त व्याज दिले जाते.
  • मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक यांसारख्या व्याजाची रक्कम मिळविण्यासाठी गुंतवणूकदारांना वेगवेगळे पर्याय मिळतात. प्रत्येक महिन्याला व्याज घेऊन तुमचे मासिक उत्पन्नात देखील वाढ होऊ शकते.
  • काही मुदत ठेवींसाठी, परिपक्वता कालावधी 5 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे, ज्यात तुम्हाला कर लाभ देखील मिळू शकतात.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना प्रत्येक वर्षाला 8.2 टक्के व्याजदर देते. परंतु समजा तुम्ही FD मध्ये 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कर सवलत मिळत नाही.

तसेच हे लक्षात ठेवा की ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणुकीची कमाल मर्यादा असते. तर, एफडीमध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नसते. याशिवाय, हे अनेक पर्यायांसह येते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts