Big decision of RBI : आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत यूपीआयशी संबंधित मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. आता UPI Lite ची पेमेंट मर्यादा वाढवण्यात आली आहे. तसेच लवकरच ऑफलाइन पेमेंटची सुविधाही सुरू करण्यात येणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने UPI Lite वरील व्यवहार मर्यादा 200 वरून 500 रुपये केली आहे. चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीच्या निर्णयांची घोषणा करताना, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, डिजिटल पेमेंटचा अनुभव वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
तुमच्या माहितीसाठी UPI Lite पहिल्यांदा सप्टेंबर 2022 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. या सुविधेद्वारे, वापरकर्ते इंटरनेटशिवाय देखील व्यवहार करू शकतात. ही सुविधा PhonePe, Paytm आणि Google Pay वर उपलब्ध करून दिली जात आहे.
RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी याविषयी बोलताना सांगितले की, ऑफलाइन UPI पेमेंटमध्ये काही बदल आवश्यक आहेत. ऑफलाइन मोडमध्ये UPI Lite व्यवहार मर्यादा 200 रुपयांवरून 500 रुपये करण्यात आली आहे. त्याची वॉलेट मर्यादा पूर्वीप्रमाणे 2,000 रुपये आहे. या निर्णयानंतर वापरकर्ते इंटरनेटशिवाय 500 रुपयांपर्यंत पैसे समोरच्या व्यक्तीला देऊ शकतील.
याशिवाय आरबीआयने एआय आधारित प्रणाली वापरून UPI वर अखंड पेमेंट सक्षम करण्याबद्दल बोलले आहे. पेमेंट करण्यासाठी वापरकर्त्यांना लवकरच एआय पॉवर सिस्टम वापरण्याची संधी मिळेल. मात्र, त्याचा तपशील अद्याप सांगण्यात आलेला नाही.
याव्यतिरिक्त, RBI ने UPI लाइट ऑन-डिव्हाइस वॉलेटद्वारे नियर फील्ड कम्युनिकेशन (NFC) तंत्रज्ञान वापरून UPI वर ऑफलाइन पेमेंट सक्षम करण्याची घोषणा केली आहे. या फीचरद्वारे युजर्स इंटरनेट उपलब्ध नसलेल्या किंवा नेटवर्क नसलेल्या भागातूनही UPI द्वारे पेमेंट करू शकतील.
गेल्या महिन्यात, Google Pay ने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर नवीन UPI Lite सेवा लाँच केली. Google Pay वरील UPI Lite सेवेद्वारे व्यवहार करण्यासाठी UPI पिन आवश्यक नाही. हे काम एका टॅपमध्ये करता येते. ते ऑफलाइन मोडमध्ये देखील करता येते.