आर्थिक

RBI कडून मोठी सुविधा सुरु ! खात्यात झिरो बॅलन्स असला तरीही UPI द्वारे करू शकणार पेमेंट

RBI : आजकाल प्रत्येकजण डिजिटल पेमेंटचा वापर करत आहे. त्यासाठी यूपीआयचा वापर करणे आवश्यक झाले आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर काळानुसार बदलत आहे. त्यात विविध सोयी-सुविधांची भर पडत आहे.

त्याचबरोबर डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून अनेक नवीन सुविधाही आणल्या जातात. आरबीआयने यूपीआय यूजर्स साठी क्रेडिट लाइन सर्विसला मान्यता दिली आहे.

बँक खात्यात झिरो बॅलन्स, तरी करू शकता यूपीआय पेमेंट

आरबीआयने यूपीआय युजर्सना क्रेडिट कार्ड सर्विस दिली आहे. याद्वारे तुमच्या बचत किंवा सॅलरी अकाउंटसारख्या बँक खात्यात झिरो बॅलन्स असतानाही यूपीआय यूजर्स पेमेंट करू शकतात. यूपीआय पेमेंट करण्यासाठी तुम्ही यूपीआयच्या नाऊ पे लेटर सेवेचा लाभ घेऊ शकता. पेमेंट केल्यानंतर तुम्ही नंतर पैसे परत करू शकता.

UPI Now Pay Later सर्विस नेमकी काय आहे?

आरबीआयने एक प्रकारच्या क्रेडिट लाइनअंतर्गत पोस्ट-पेमेंट म्हणजेच यूपीआय नाऊ पे लॅटर करण्याची सुविधा सुरू केली आहे. जर तुमच्या बँक खात्यात पैसे नसतील तर त्याचा वापर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. गरज पडल्यास यूपीआय नाऊ पे लेटर सेवेचा वापर करू शकता. आपण आपल्या क्रेडिट स्कोअरअंतर्गत या सेवेचा लाभ घेऊ शकता.

यूपीआय यूजर्स या पेमेंट सेवांचा लाभ घेऊ शकतात

यूपीआय पेमेंटसाठी युजर्सला केवळ बँक किंवा डेबिट कार्डच नाही तर इतरही अनेक पर्याय लिंक करावे लागतात. आपल्या बचत खात्याव्यतिरिक्त आपण क्रेडिट कार्ड, ओव्हरड्राफ्ट खाते, यूपीआय क्रेडिट लाइन आणि प्रीपेड वॉलेटशी देखील यूपीआय लिंक करू शकता.

UPI Now Pay Later सेवा कशी वापरायची?

UPI Now Pay Later सेवा अनेक बँकांनी सुरू केली आहे. हे तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेचे मोबाइल बँकिंग किंवा नेट बँकिंग अॅप उघडावे लागेल. येथे तुम्हाला प्री-अप्रूव्ड लोन सेक्शन दिसेल, ज्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही UPI Now Pay Later ची सेवा मिळवू शकता. ही सुविधा प्रत्येक बँकेत वेगवेगळ्या नावाने किंवा मार्गांनी उपलब्ध असू शकते. खात्री करण्यासाठी तुम्ही तुमच्या बँकेशी संपर्क साधावा.

UPI Now Pay Later नुसार वापरलेले पैसे किती दिवसांत परत करावे लागतात ?

यूपीआय नाऊ पे लेटर सेवेअंतर्गत तुम्ही किती व्यवहार करू शकता हे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून आहे. मात्र या सेवेचा वापर करून तुम्ही 7,500 रुपयांपासून 50,000 रुपयांपर्यंत पेमेंट करू शकता. क्रेडिट लाइन वापरल्यानंतर तुम्हाला 45 दिवसांच्या आत पैसे परत करावे लागतील. तसे न केल्यास लेट फी सह 42.8 टक्क्यांपर्यंत भरमसाठ व्याज द्यावे लागेल. यासोबतच पेमेंटवर जीएसटीचाही समावेश असेल, जो भरावा लागणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: RBI

Recent Posts