RD Interest Rate : सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. गुंतवणूक करून पैसे कमावणाऱ्यांसाठी ही बातमी अधिक महत्त्वाची ठरणार आहे. सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वपूर्ण ठरणारी बातमी आहे. जर तुम्ही आरडी केली असेल तर तुम्हाला बंपर बेनिफिट्स मिळतील. केंद्र सरकारने गुंतवणूकदारांसाठी मोठी घोषणा केली आहे.
चला जाणून घेऊयात त्याविषयी सविस्तर –
केंद्र सरकारने डिसेंबर तिमाहीसाठी ५ वर्षांच्या पोस्ट ऑफिस आरडी योजनेच्या व्याजदरात वाढ केली आहे. याचा फायदा अनेकांना होणार आहे. सरकारने पाच वर्षांच्या आरडी योजनेवरील व्याजदर वाढवून ६.७ टक्के केला आहे. अशा तऱ्हेने दीर्घकाळ आरडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल.
*स्मॉल सेविंग स्कीम
सरकारने इतर अल्पबचत योजनांच्या व्याजदरात बदल केलेला नाही. जसे की ज्येष्ठ नागरिक बचत योजना, पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना आणि किसान विकास पत्र आदींमध्ये कसलाही बदल केला नाही. सरकार दर तिमाहीला व्याजदराचा आढावा घेते, त्यानंतर सरकारने केलेल्या बदलांचीही माहिती दिली जाते.
*असे असतील व्याजदर
उद्यापासून ऑक्टोबर महिना सुरू होत आहे. अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना ऑक्टोबर ते डिसेम्बर २०२३ तिमाहीसाठी पोस्ट ऑफिस खात्यावर ४ टक्के, पोस्ट ऑफिस आरडीवर ६.७ टक्के, पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेवर ७.४ टक्के आणि किसान विकास पत्रावर ७.५ टक्के व्याज मिळेल. तसेच पीपीएफवर व्याजदर ७.१ टक्के, एसएसवाय योजनेवर ८ टक्के, एनएससीवर ७.७ टक्के आणि एससीएसएसवर ८.२ टक्के व्याज दर आहे. या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगली कमाई करू शकता.