Axis Bank FD : खासगी क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही या बँकेत FD करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. अॅक्सिस बँकेने FD व्याजदरात वाढ केली आहे. बँकेच्या वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, एफडीवरील हे नवीन दर 6 सप्टेंबरपासून 2023 पासून लागू झाले आहेत.
आता ग्राहकांना एफडी करण्यावर आधी पेक्षा जास्त व्याज मिळणार आहे. अॅक्सिस बँकेने 2 कोटी आणि त्याहून अधिक रकमेच्या एफडीवरील व्याजदरात बदल केला आहे. ग्राहक आता पूर्वीपेक्षा जास्त व्याज मिळवू शकतात.
अॅक्सिस बँकेने लागू केलेले नवीन व्याजदर पुढीलप्रमाणे :-
बँक 30 दिवस ते 45 दिवस 2 कोटी किंवा त्याहून अधिकच्या एफडीवर 5.50% व्याज देत आहे. 5 ते 10 कोटी, 10 ते 25 कोटी, 25 ते 50 कोटी, 100 कोटी किंवा त्याहून अधिक यांना त्याच कालावधीसाठी 5.50 टक्के व्याज मिळेल.
बँक 2 कोटी ते 5 कोटी, 5 ते 10 कोटी, 10 ते 25 कोटी, 25 ते 50 कोटी आणि एक्सिसमध्ये 100 कोटींहून अधिकच्या एफडीवर 46 ते 60 दिवसांसाठी 5.80 टक्के व्याज देईल.
1 वर्ष 11 दिवस ते 1 वर्ष 24 दिवसांसाठी 2 ते 5 कोटी, 5 ते 10 कोटी, 10 ते 25 कोटींची FD केल्यास 7.35 टक्के व्याज मिळेल. याच कालावधीसाठी 25 ते 50 कोटी रुपयांच्या एफडीवर, 50 ते 100 कोटी रुपयांच्या आणि 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेवर 7.40 टक्के व्याज मिळेल. 5 ते 10 वर्षांसाठी 2 कोटी ते 5 कोटी, 5 ते 10 कोटी, 10 ते 25 कोटी, 25 ते 50 कोटी आणि 100 कोटींहून अधिकच्या एफडीवर 7.20 टक्के व्याज दिले जाईल.
जर तुम्ही देखील सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. येथे गुंतवणूक करून तुम्ही चांगला नफा कमावू शकता. येथील गुंतवणूक तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. जर तुम्ही येथे गुंतवणूक केली तर तुम्हाला अधिक फायदा होईल, तसेच येथे तुम्हाला आधीपेक्षा जास्त व्याज मिळेल.