आर्थिक

BOB BRO Saving Account: ‘या’ ग्राहकांसाठी बँक ऑफ बडोदाने आणली खास योजना! मिळेल 2 लाख रुपये मोफत अपघाती विमा

BOB BRO Saving Account:- देशातील ज्या काही प्रमुख सरकारी बँक आहेत त्यांच्या माध्यमातून ग्राहकांसाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जातात व सोयी सुविधा देखील उपलब्ध करून दिले जातात. भारतामध्ये प्रमुख बँकांचा विचार केला तर यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक,

आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय बँक, बँक ऑफ बडोदा या महत्त्वाच्या बँका असून  ग्राहकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या बँका कायमच अलर्ट असतात. ग्राहकांसाठी अनेक नवनवीन चांगल्या योजना राबवण्यासाठी देखील या बँका कायम पुढे असतात.

अशीच एक फायद्याची योजना देशातील प्रमुख असलेल्या सरकारी बँक म्हणजेच बँक ऑफ बडोदाने आणली असून या बँकेने 16 ते 25 वर्षे वयोगटातील ग्राहकांकरिता बीओबी बीआरओ सेविंग अकाउंट सुरू केले आहे. या माध्यमातून अनेक प्रकारच्या सोयी सुविधा ग्राहकांना बँक ऑफ बडोदा कडून देऊ करण्यात आलेले आहेत. याबाबतचे महत्त्वाची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 काय आहे बँक ऑफ बडोदाची योजना?

बँक ऑफ बडोदाने सोळा वर्षे ते पंचवीस वर्षे वयोगटातील ग्राहकांकरिता बीओबी बीआरओ सेविंग अकाउंट योजना सुरू केली असून आता या वयोगटातील ग्राहकांना एक रुपया देखील न भरता बँक ऑफ बडोदामध्ये खाते सुरू करता येणार आहे. हे बचत खाते तरुण ग्राहकांना आता वेगवेगळ्या ऑफरसह बँकिंग प्रणालीशी जोडण्याचे

व या वयोगटातील ग्राहकांच्या ज्या काही छोट्या-मोठ्या आर्थिक गरजा असतात त्या पूर्ण करण्यासाठी बँक मदत करणार असल्याचे देखील बँक ऑफ बडोदाचे मुख्य महाव्यवस्थापक रवींद्रसिंग नेगी यांनी म्हटले आहे. या बचत खात्याच्या माध्यमातून तरुण ग्राहकांना आता बँकेकडून अनेक प्रकारच्या सेवा देण्यात येणार आहेत. त्या सेवा पाहिल्या तर…..

1- या खात्याअंतर्गत 16 ते 25 वर्षे वयोगटातील जे काही तरुण आहेत त्यांना बँकेत झिरो बॅलन्स बचत खाते उघडता येणार आहे.

2- एवढेच नाही तर या खातेधारकांना लाईफ टाईम फ्री रुपे प्लॅटिनम डेबिट कार्ड देखील देण्यात येणार आहे.

3- एवढेच नाही तर या बचत खात्याच्या माध्यमातून ग्राहकांना जे काही डेबिट कार्ड मिळणार आहे त्यावर ग्राहकांना देशातील नामांकित ब्रँडवर आकर्षक ऑफर देखील मिळणार आहेत.

4- महत्वाचे म्हणजे या माध्यमातून खातेधारकांना दोन लाख रुपयांपर्यंत मोफत वैयक्तिक अपघात विमा संरक्षण मिळणार आहे.

5- तसेच या माध्यमातून ग्राहकांना ऑटो स्विपची सुविधा देखील मिळणार आहे.

6- तसेच नेट बँकिंग देखील मोफत वापरता येणार असून या माध्यमातून अनेक प्रकारचे आर्थिक व्यवहार या ग्राहकांना करता येणार आहेत.

7- मोफत एसएमएस आणि ईमेल अलर्ट सुविधा मिळणार आहेत.

8- तसेच या खातेधारकांना डिमॅट एएमसी मध्ये शंभर टक्के सूट मिळणार आहे.

9- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या खातेधारकांना 0 प्रक्रिया शुल्कासह सवलतीच्या व्याजदरामध्ये एज्युकेशनल लोन म्हणजे शैक्षणिक कर्ज देखील मिळणार आहे.

अशा विविध प्रकारच्या चांगल्या सेवा आणि सुविधा बँक ऑफ बडोदा च्या माध्यमातून 18 ते 25 वयोगटातील ग्राहकांसाठी आता बीओबी बीआरओ सेविंग अकाउंटच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts