FD Interest Rates : फिक्स्ड डिपॉझिट (FD) हा गुंतवणूक पर्याय भारतीय ग्राहकांमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय राहिला आहे. कारण येथे तुम्हाला सुरक्षितता प्रदान केली जाते. तसेच सध्या एफडी मध्ये मजबूत परतावा देखील दिला जात आहे.
अशातच तुम्ही तुमची बचत मुदत ठेवींमध्ये गुंतवून बंपर नफा मिळविण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. खरं तर, देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रापासून ते खाजगी क्षेत्रातील बँका सध्या त्यांच्या ग्राहकांना 3 वर्षांच्या FD वर जास्तीत जास्त 8.60 टक्के व्याज देत आहेत. येथे तुमची बचत ३ वर्षांसाठी फिक्स डिपॉझिटमध्ये जमा करून तुम्ही झटपट श्रीमंत बनू शकता, येथे आम्ही अशा १० बँका सांगणार आहोत, ज्या उत्तम परतावा देत आहेत.
SBM बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 3 वर्षांच्या FD वर 8.10 टक्के व्याज आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 8.60 टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी, DCB बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 3 वर्षांच्या FD वर 8 टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 8.50 टक्के व्याज देत आहे. याशिवाय येस बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 7.75 टक्के तर ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 3 वर्षांच्या FD वर 8.25 टक्के व्याज देत आहे. तर ड्यूश बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 3 वर्षांसाठी 7.75 टक्के व्याज देत आहे आणि तितकेच व्याज त्यांच्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना देत आहे. दुसरीकडे, IndusInd बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 7.50 टक्के व्याज आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 3 वर्षाच्या FD वर 8 टक्के व्याज देत आहे.
दुसरीकडे, HSBC बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 3 वर्षांच्या FD वर 7.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 8 टक्के व्याज देत आहे. याशिवाय बंधन बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 3 वर्षांच्या FD वर 7.25 टक्के व्याज आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.75 टक्के व्याज देत आहे. तर बँक ऑफ बडोदा आपल्या सामान्य ग्राहकांना 7.05 टक्के आणि 3 वर्षाच्या FD वर ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.55 टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी, IDFC फर्स्ट बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 3 वर्षांच्या FD वर 7 टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.50 टक्के व्याज देत आहे. याशिवाय पंजाब नॅशनल बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 7 टक्के आणि 3 वर्षाच्या FD वर आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.50 टक्के व्याज देत आहे.