आर्थिक

Business Idea: 11 हजार रुपये किमतीचे हे मशीन तुम्हाला सहजपणे कमवून देईल 50 हजार प्रतिमहिना! वाचा माहिती

Business Idea:- स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय असणे हे नोकरी असण्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त लाभदायक आहे हे आताच्या परिस्थितीचा विचार केला तर सिद्ध होते. कारण नोकरी मिळणे जवळजवळ सध्याच्या परिस्थितीत दुरापास्त झाले असून त्याऐवजी एखादा व्यवसायामध्ये आपले नशीब आजमावून तो व्यवसाय वाढीस लावणे खूप गरजेचे आहे. व्यवस्थित नियोजन तसेच प्रयत्न केले व सगळ्या गोष्टींचा सांगोपांग विचार करून व्यवसायाची उभारणी केली तर नक्कीच माणसाला यश मिळू शकते.

जर आपण व्यवसायांची यादी पाहिली तर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय आपल्याला सांगता येतील व या यादीमध्ये अनेक व्यवसाय असे आहेत की त्या स्त्रियांसाठी खूप फायदेशीर ठरतात. महिलांनी घरचे काम करून बाहेर नोकरी करण्यापेक्षा घरीच राहून जर एखादा व्यवसाय केला तर घरी लक्ष ठेवता येणे शक्य आहे व मुला बाळांचे संगोपन करण्याच्या दृष्टिकोनातून देखील व्यवसाय फायदेशीर ठरू शकतात. महिलांसाठी अनेक प्रकारचे व्यवसाय आहेत.

त्यातीलच आपण जर एक व्यवसाय पाहिला तर तो अवघ्या 11000 रुपये किमतीचे मशीन खरेदी केले तरी महिलांना घरी बसून खूप चांगल्या पद्धतीने आर्थिक प्राप्ती मिळवणे शक्य आहे. त्या अनुषंगाने या लेखात आपण अशीच एक व्यवसाय कल्पना पाहणार आहोत जी महिलांकरिता खूप फायद्याची ठरेल.

 इलेक्ट्रिक शिलाई मशीनच्या सहाय्याने करता येणारे महिलांसाठी असलेले व्यवसाय

जर महिलांचा विचार केला तर अनेकदा घरचे काम आटोपून महिलांना रिकामा वेळ असतो व यामध्ये इलेक्ट्रिक शिलाई मशीन च्या साह्याने जर शिवणकाम व्यवसाय सुरू केला तर या मशीनच्या माध्यमातून अगदी जलद आणि सोप्या पद्धतीने महिलांना हे काम करता येणार आहे व या माध्यमातून वेळ आणि पैसा देखील वाचू शकणार नाही. साधारणपणे इलेक्ट्रिक शिलाई मशीन पासून सहा प्रकारचे व्यवसाय महिलांना करता येणे शक्य आहे.त्यातील पहिला म्हणजे…..

1- फॅशन डिझाईनिंग महिला कपडे डिझाईन करून त्याचा व्यवसाय करू शकतात व स्वतःचे स्थानिक आणि ऑनलाईन पद्धतीने विक्री सुरू करू शकतात. यामध्ये टेलरिंग, टिचिंग तसेच डिझायनिंग व नवीन अशी फॅशन तसेच ट्रेंडसह ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करू शकतात.

2- कापड उत्पादन महिलावर्ग कपड्याशी संबंधित उत्पादने जसे की कुर्ता, पायजमा, मुखवटे तसेच उन्हाळी कपडे इत्यादी बनवू शकतात आणि त्यांची विक्री करू शकतात. कपड्यांच्या विक्रीकरिता विविध माध्यमांचा वापर करून आपली विक्री वाढवून चांगला पैसा मिळवू शकतात.

3- घराच्या सजावटीच्या वस्तू तसेच महिलावर्ग घरातील सजावटीच्या वस्तू बनवू शकतात आणि त्यांची विक्री देखील करू शकता. यामध्ये विणलेल्या पगड्या, कुर्ता तसेच कुशन कव्हर आणि इतर सुंदर वस्तूंचा यामध्ये समावेश करता येईल.

4- मुलांचे कपडे या इलेक्ट्रिक मशीनच्या सहाय्याने स्त्रिया मुलांसाठी कपडे बनवू शकतात आणि ते कपडे विक्रीतून चांगला व्यवसाय सुरू करू शकतात. या कॅटेगरीत लहान मुलांचे पार्टीचे कपडे तसेच त्यांचे नॅपकिन्स आणि इतर कपड्यांच्या वस्तू यांचा समावेश आपल्याला करता येईल.

5- टेलरिंग सेवा तसेच या कॅटेगिरी चा विचार केला तर महिला वर्ग वैयक्तिकरित्या टेलरिंग सेवा देऊ शकतात व ग्राहकांच्या टेलरिंग आणि टेलरिंग संबंधीच्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करू शकता तो या माध्यमातून देखील हजार रुपये कमवू शकतात.

6- कार्यशाळा आणि वर्ग महिला या टेलरिंग आणि फॅशन डिझाइनिंगचे क्लासेस किंवा वर्ग आयोजित करून दुकानाच्या लागणाऱ्या गरजा भागवून व्यवसाय करू शकतात.

अशाप्रकारे व्यवसायांची सुरुवात करू शकतात व त्यांची जाहिरात तसेच प्रसार व प्रचार, तसेच उत्पादनाची ब्रॅण्डिंग आणि विपणन इत्यादी करिता ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करून जोरदार जाहिरात करू शकता व या माध्यमातून व्यवसाय वृद्धी करू शकता.

 कितीला मिळते हे मशीन किती करू शकतात कमाई?

इलेक्ट्रिक शिलाई मशीनची किंमत ही त्याच्या ब्रँड आणि मॉडेल्स अवलंबून असते. परंतु साधारणपणे विचार केला तर एका सामान्य इलेक्ट्रिक शिलाई मशीनची किंमत पाच हजार ते वीस हजार रुपये पर्यंत असू शकते. यामध्ये तुम्हाला आणखी काही स्वतंत्र उपकरणांची आवश्यकता भासू शकते जसे की कटिंग,स्टि्चिंग, बटणे तसेच थ्रेड इत्यादी. या वस्तूंची किंमत ही तुमचा व्यवसायाचे प्रमाण आणि प्रकार यानुसार कमी जास्त होऊ शकते.

जर या व्यवसायात होणाऱ्या कमाईचा विचार केला तर ते तुमचे प्रयत्न आणि बाजारात सध्या असलेली स्पर्धा यावर सर्वस्वी अवलंबून आहे. सर्व जर काही व्यवस्थित असले तर तुम्ही या व्यवसायातून महिन्याला वीस हजार ते 50 हजार रुपये सहजपणे कमवू शकता. परंतु यामध्ये तुमचे शिवणकामाचे कौशल्य, योग्यता तसेच दर आणि सेवांची गुणवत्ता कशी आहे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.

 

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts