आर्थिक

Business Idea 2023 : आठवी पास लोकांसाठी सुवर्ण संधी! पोस्ट ऑफिससोबत सुरू करा ‘हा’ व्यवसाय ; होणार बंपर कमाई

Business Idea 2023 :  आज देशातील अनेकजण कमी गुंतवणूक करून स्वतःचा व्यवसाय सुरु करत आहे आणि दरमहा हजारो रुपये कमवत आहे. यातच तुम्ही देखील तुमच्यासाठी बंपर कमाई करून देणारा नवीन व्यवसाय सुरू करण्याची तयारी करत असाल तर आज आम्ही तुम्हाला एका भन्नाट व्यवसायबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या लाभ घेऊन दरमहा सहज हजारो रुपये कमवू शकतात. चला मग जाणून घेऊया या भन्नाट आणि बेस्ट व्यवसायबद्दल संपूर्ण माहिती.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या  हा व्यवसाय म्हणजे पोस्ट ऑफिसची फ्रँचायझी घेण्याचा व्यवसाय आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की इंडिया पोस्टने नवीन पोस्ट ऑफिस उघडण्यासाठी फ्रँचायझी योजना सुरू केली आहे. अजूनही देशातील अनेक क्षेत्रे आहेत जिथे पोस्ट ऑफिस सुरू व्हायचे आहेत. हे लक्षात घेऊन फ्रँचायझी दिली जात आहे.

फ्रँचायझी घेण्याची पात्रता

पोस्ट ऑफिस फ्रँचायझी मिळवण्यासाठी व्यक्तीचे वय 18 वर्षे असावे. कुटुंबातील कोणताही सदस्य विभागात नसावा. फ्रँचायझी  घेणार्‍या व्यक्तीकडे मान्यताप्राप्त शाळेतील 8वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तुम्हाला फॉर्म भरून फ्रँचायझीसाठी अर्ज करावा लागेल. यानंतर, निवड झाल्यावर, इंडिया पोस्टसोबत MoU करार करावा लागेल.

किती खर्च किती नफा

पोस्ट ऑफिस फ्रँचायझी उघडण्यासाठी किमान सुरक्षा रक्कम 5,000 रुपये आहे. तुम्हाला पोस्ट ऑफिस फ्रँचायझीसाठी अर्ज करावा लागेल. यासाठी तुम्ही अधिकृत लिंकला भेट देऊ शकता. कमाईबद्दल बोलायचे झाल्यास, स्पीड पोस्टसाठी 5 रुपये, मनीऑर्डरसाठी 3-5 रुपये, पोस्टल स्टॅम्प आणि स्टेशनरीवर 5 टक्के कमिशन मिळते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सेवांसाठी वेगवेगळे कमिशन उपलब्ध आहेत.

हे पण वाचा :-  Airtel 5G Data Offer: आनंदाची बातमी ! आता एअरटेल युजर्सनाही मिळणार फ्री अमर्यादित 5G डेटा ; फक्त ‘हे’ काम करावे लागेल

Ahmednagarlive24 Office

Recent Posts