Business Idea :- बरेच व्यक्ती नोकरी करत असताना किंवा शेती करत असताना देखील बरेच व्यक्ती काही व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर असतात.परंतु घरी बसून देखील अतिरिक्त उत्पन्न मिळावे म्हणून अनेक प्रकारचे व्यवसाय करत असतात. या प्रकारचे व्यवसाय हे प्रामुख्याने इंटरनेटच्या मदतीने आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे व्यक्तीला शक्य झालेले आहे.
इंटरनेट आणि टेक्नॉलॉजी मध्ये झालेल्या प्रगतीमुळे जगातील अनेक व्यावसायिक क्षेत्र खूप वेगाने पुढे गेले असून या माध्यमातून घरी बसून व्यवसाय सुरू करण्याच्या अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अनेक प्रकारचे व्यवसाय करता येतात. त्यापैकी काही महत्त्वाच्या व्यवसायांची माहिती या लेखात घेऊ.
घरी बसून करता येणारे फायदेशीर व्यवसाय
1- ऑनलाइन विक्री व्यवसाय– व्यवसायाची अशी पद्धत आहे की यामध्ये व्यापारी त्यांच्या उत्पादनांना किंवा सेवांना इंटरनेटच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवतात व त्यांची विक्री देखील करतात. या पद्धतीमध्ये आपल्या व्यवसायाची अथवा उत्पादनांची माहिती देण्याकरता वेबसाईटची निर्मिती केली जाते व या वेबसाईटवर आपल्या उत्पादनांची माहिती अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली जाते. त्या माध्यमातून घरी बसून ऑनलाईन पद्धतीने अनेक उत्पादनांची विक्री करता येते. याकरिता तुम्हाला एखाद्या ई-कॉमर्स वेबसाईट वर तुमच्या उत्पादनांना लिस्ट करणे म्हणजेच रजिस्टर करणे गरजेचे असते व मागणीनुसार ग्राहकांसाठी ते उपलब्ध करणे देखील गरजेचे असते.
2- फूड बिझनेस– फूड बिजनेस हा इतर उद्योगांपेक्षा वेगळा असून त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करण्याच्या व्यवसायाचा समावेश होतो. वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करून त्यांची विक्री करणे या व्यवसायामध्ये अभिप्रेत असते. या प्रकारच्या व्यवसायामध्ये तुम्ही अनेक पर्यायाची निवड करू शकतात जसे की रेस्टॉरंट, केटरिंग तसेच बेकरी, कॅफे इत्यादी उभारून हा व्यवसाय सुरू करू शकतात. आज कालच्या युगामध्ये फूड बिजनेस मध्ये देखील ऑनलाईन स्पर्धा वाढलेली असून यामुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा प्रचार आणि तयार खाद्य पदार्थांची विक्री याकरिता डिजिटल मार्केटिंग व त्यासंबंधीचे तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे.
3- फ्रीलान्सिंग– हा एक डिजिटल स्वरूपाचा व्यवसाय असून माध्यमातून तुम्ही घरी बसून काम करू शकतात. त्यामध्ये तुमच्यात असलेले विशेष कौशल्य आणि अनुभव या जोरावर तुम्हाला चांगल्या पगारावर घरी बसून काम करता येऊ शकते.या व्यवसाय करता तुम्हाला योग्य मार्केटिंग आणि प्रचाराची आवश्यकता असते. जेणेकरून तुमच्या अनुभवाची काही व्यक्तिंना गरज आहे त्यांच्यापर्यंत ती व्यवस्थितपणे पोहोचू शकेल. या व्यवसायाकरिता तुमच्याकडे इंटरनेटची सुविधा असणे गरजेचे असून एक आकर्षक अशी वेबसाईट देखील बनवणे गरजेचे आहे. व्यवसायामध्ये तुमच्या ग्राहकांच्या शंका असतील तर त्यांचे निरसन करण्याचे ज्ञान आणि कौशल्य असणे गरजेचे आहे.
4- विविध गृह उद्योग– होममेड उत्पादने म्हणजेच घरी बसून चांगले उत्पादनांची निर्मिती करणे व त्यांची विक्री हा देखील व्यवसाय खूप फायदेशीर असून यामध्ये तुम्ही तयार केलेले उत्पादने ऑनलाइन पद्धतीने विकू शकता. यामध्ये तुम्ही मिठाई, सॉस तसेच चटणी, पापड इत्यादी खाद्यपदार्थ घरी बनवू शकतात. ही उत्पादने तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने विक्री करू शकतात. तुम्ही तयार करत असलेल्या उत्पादनांचे मार्केटिंग करणे गरजेचे असून व्यवस्थित बाजारपेठेचा अभ्यास देखील महत्त्वाचा ठरतो.
5- बेकरी व्यवसाय– हा देखील फायदेशीर व्यवसाय असून या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही स्वादिष्ट असे अनेक बेकरी उत्पादने तयार करू शकतात. या व्यवसायाच्या माध्यमातून रोटी, ब्रेड तसेच पेस्ट्री, केक आणि कुकीज इत्यादी तयार केले जातात. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला अगोदर जागेची निवड, यंत्रसामग्री तसेच आवश्यक कर्मचारी वर्ग नियुक्त करणे गरजेचे असून त्यानंतर तुम्ही बेकरी उत्पादने तयार करून मार्केटिंग हा पुढचा टप्पा खूप महत्त्वाचा असतो. यामध्ये देखील तुम्ही तयार केलेली उत्पादने ऑनलाइन वेबसाईट सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरात देऊन लोकांपर्यंत पोहोचवू शकता व त्या माध्यमातून विक्री वाढवू शकता.