आर्थिक

Business Idea: घरी बसवा एटीएम आणि लाखो रुपये कमवा! वाचा एटीएम बसवण्याचा सोपा मार्ग

Business Idea:- एटीएम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एटीएम च्या माध्यमातून आपल्याला कुठेही केव्हाही  पैसे काढता येतात. म्हणजेच आपल्याला पैसे काढण्यासाठी किंवा डिपॉझिट करण्यासाठी आता बँकेमध्ये जाण्याची गरज भासत नाही. असे महत्त्वपूर्ण असलेले एटीएम घरी बसवून तुम्हाला पैसा देखील कमावता येतो.

म्हणजेच या माध्यमातून तुम्ही अतिरिक्त इन्कम मिळवू शकतात. याची प्रक्रिया अगदी सहज आणि सोपी आहे. जर तुम्हाला घरी एटीएम बसवायचे असेल तर यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

टाटा आणि इतर काही कंपन्या  या बँकांच्या माध्यमातून एटीएम बसवण्याचे काम करतात. या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो व या अर्जाच्या माध्यमातून तुम्ही एटीएम बसवून चांगला उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करू शकतात.

घरी एटीएम बसवून तुम्ही किती पैसे मिळवू शकतात?

एटीएम मधून जे काही तुम्हाला आर्थिक उत्पन्न मिळते ते तुमचे दररोज किती व्यवहार होत आहेत त्यावर अवलंबून असते. साधारणपणे तुम्ही बसवलेल्या एटीएमच्या माध्यमातून प्रत्येक दिवसाला जर पन्नास व्यवहार झाले तर प्रत्येक महिन्याला तुम्हाला 20 हजार रुपये पर्यंत कमी करता येते. नंतर कालांतराने यामध्ये वाढ होऊन जर 300 व्यवहारांपर्यंत गेली तर महिन्याला तुम्ही एक ते सव्वा लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळवू शकतात.

 कशा पद्धतीने करावा ऑनलाईन अर्ज

यासाठी देशातील अनेक कंपन्या बँकांच्या माध्यमातून एटीएम बसवण्याचे काम करतात. त्यामुळे तुम्हाला जर घरी एटीएम बसवायचे असेल तर तुम्हाला या कंपन्यांशी संपर्क साधने गरजेचे राहील व या कंपन्यांनाच तुम्हाला यासाठी अर्ज करावा लागतो. यामध्ये जर आपण कंपन्यांची नावे बघितली तर टाटा इंडिकॅश,

मुथूट एटीएम, इंडिया वन एटीएम आणि हिताची एटीएम अशा कंपन्यांची नावे घेता येतील. समजा तुम्हाला यासाठी मुथूट एटीएम मशीन संपर्क साधायचा असेल तर तुम्हाला या कंपनीच्या  www.muthootatm या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. या वेबसाईटवर तुम्हाला या संबंधी चौकशीचा देखील पर्याय मिळतो

व त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्यवसायाचा पर्याय मिळेल. या व्यवसाय पर्यायावर तुम्ही क्लिक केले तर एक अर्ज ओपन होतो व हा अर्ज भरून तुम्ही एटीएम बसवण्याकरिता अर्ज करू शकता. तसेच भारत 1 एटीएम मधून एटीएम घ्यायचे असेल तर तुम्हाला कंपनीच्या https://india1payment.in/index.html या संकेतस्थळावर जावे लागेल

व त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला यासाठीचा अर्ज करता येऊ शकतो. तसेच तुम्हाला टाटा इंडिकॅशच्या माध्यमातून एटीएम बसवायचे असेल तर तुम्हाला टाटा इंडिकॅश या कंपनीशी संपर्क साधावा लागेल. यासाठी तुम्हाला टाटा इंडिकॅशच्या  https://indicash.co.in/ वर जाऊन अर्ज करणे गरजेचे राहील. तसेच तुम्हाला हिताची एटीएम मधून एटीएम बसवायचे असेल तर तुम्हाला या ठिकाणी देखील ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

याकरिता तुम्ही कंपनीची वेबसाईट https://www.hitachi-payment.com या वेबसाईटला भेट देऊ शकतात. या ठिकाणी तुम्हाला कॉन्टॅक्ट असचा पर्याय मिळतो. यावर तुम्ही क्लिक केल्यावर तुम्हाला इन्क्वायरी हा एक पर्याय मिळेल. या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला एटीएम फ्रेंचाईजीचा पर्याय दिसतो. या ठिकाणी तुम्हाला एक मेल आयडी दिसून येईल व त्यावर तुम्हाला तुमचा संपूर्ण तपशीलासह अर्ज सादर करावे लागेल.

 एटीएम बसवण्याकरिता तुम्हाला किती जागा लागेल?

तुम्हाला जर घरी एटीएम बसवायचे असेल तर तुमच्याकडे कमीत कमी ५० स्क्वेअर फुट ते शंभर स्क्वेअर फुट जागेची आवश्यकता असते. जर तुमच्याकडे एवढी जागा नसेल तर तुम्ही भाडेतत्त्वावर जागा घेऊ शकतात. एटीएम बसवण्याकरिता तळमजल्याची आवश्यकता असते. तसेच जागेचे निवड करताना ज्या ठिकाणी लोकांची वर्दळ जास्त असेल अशी जागेची निवड करणे फायद्याचे ठरते.

 एटीएम साठी अर्ज करताना काही आवश्यक माहिती

जेव्हा तुम्ही घरी एटीएम बसवण्यासाठी अर्ज कराल तेव्हा तुम्हाला काही महत्त्वाची माहिती द्यावी लागते व ती म्हणजे…..

पिन कोड सह शहराच्या नावाने पूर्ण पत्ता, जागा किती चौरस फुटाची आणि चटई क्षेत्राची आहे?, लोकांची दररोजची वर्दळ अंदाजे किती असते? व्यावसायिक वापरासाठी त्या जागेची परवानगीची स्थिती, जागा भाडेतत्त्वावर असेल तर प्रती चौरस फूट अंदाजे भाडे, संपर्कासाठी  मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी व ज्या ठिकाणी एटीएम बसवता येईल त्या ठिकाणचा फोटो

 एटीएम बसवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी

1- एटीएम बसवण्याकरिता किंवा एटीएम  मशीन चालवण्यासाठी तुम्हाला एक किलो वॅट क्षमतेचे वीज कनेक्शन घेणे गरजेचे आहे.

2- एटीएम मशीनच्या बाहेर लोकांना उभे राहण्यासाठी पुरेशी जागा असावी.

3- त्याच बँकेचे दुसरे एटीएम तुमच्या एटीएम पासून कमीत कमी 100 मीटर अंतर असले पाहिजे.

4- 24 तास विजेची सुविधा असावी.

5-एटीएम मशीन बसवण्यासाठी छत काँक्रीटच्या असावे.

6- एटीएम च्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि नीटनेटका असावा.

7- तसेच महत्त्वाचे म्हणजे एटीएम बसवण्यासाठी तळमजला उत्तम ठरतो.

अशा पद्धतीने तुम्ही घरी एटीएम बसून चांगला पैसा मिळवू शकतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts