Categories: आर्थिक

Business Idea: कशाला नोकरीची झंझट?कमी खर्चामध्ये घरबसल्या सुरू करा ‘हा’ व्यवसाय! कमवा लाखो रुपये

Business Idea:- दरवर्षी अनेक विद्यापीठांमधून पदवी घेऊन बाहेर निघणाऱ्या  तरुणांची संख्या आणि उपलब्ध नोकऱ्यांचे प्रमाण पाहिले तर ते खूप व्यस्त आहे. म्हणजेच सुशिक्षित तरुणांच्या मानाने नोकऱ्यांचे प्रमाण अगदीच कमी असल्यामुळे शिक्षण घेऊन देखील नोकरी मिळत नसल्याने अनेक तरुण बेरोजगार असताना आपल्याला दिसून येतात.

या बेरोजगारीच्या समस्येवर मात करायची असेल तर तरुणांनी व्यवसाय करण्याला प्राधान्य दिल्याशिवाय कुठलाही पर्याय नाही. व्यवसाय म्हटले म्हणजे नोकरीपेक्षा नक्कीच उत्तम मानला जातो. परंतु व्यवसाय जरी करायचे म्हटले तरी मनामध्ये सगळ्यात अगोदर येते ते म्हणजे कुठला व्यवसाय करावा? तसेच किती पैसा लागेल किंवा गुंतवणूक किती करावी लागेल?

या गोष्टींना देखील तेवढेच महत्त्व असते. त्यामुळे व्यवसायाची निवड करताना कमीत कमी गुंतवणुकीत चांगली मागणी असणारा व्यवसाय उभारणे गरजेचे असते. त्यामुळे बरेच जण कमीत कमी गुंतवणुकीत कोणता व्यवसाय सुरू करता येऊ शकतो? याच्या शोधात असतात. त्यामुळे आपण या लेखांमध्ये अशा एका व्यवसायाची माहिती घेणार आहोत जो तुम्हाला अगदी कमी बजेटमध्ये सुरू करता येऊ शकतो व चांगला पैसा देऊ शकतो.

 अगरबत्ती व्यवसाय देऊ शकतो तुम्हाला लाखोत नफा

जर तुम्ही कमीत कमी पैशांमध्ये व्यवसाय करायचा विचार करत असाल तर तुमच्याकरिता अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय हा चांगला व्यवसाय सिद्ध होऊ शकतो. विशेष म्हणजे हा व्यवसायात तुम्ही तुमचा ब्रँड बनवू शकतात व खूप मोठ्या प्रमाणावर नफा मिळवू शकतात.

तसेच असे व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून देखील प्रोत्साहन देण्यात येते. एवढेच नाही तर खादी आणि ग्राम उद्योग आयोगाने देशाला अगरबत्ती उत्पादनामध्ये स्वावलंबी बनवता यावे याकरिता प्रस्तावित केलेल्या रोजगार निर्मिती कार्यक्रमाला देखील आता मोदी सरकारकडून मान्यता देण्यात आलेली आहे.

 अगरबत्ती व्यवसाय सुरू करण्याकरिता तुम्हाला कोणत्या गोष्टींची आवश्यकता भासेल?

साधारणपणे अगरबत्ती व्यवसाय सुरू करण्याकरता तुम्हाला काही यंत्रे लागतील. यात प्रामुख्याने ड्रायर मशीन, मिक्सर मशीन आणि मुख्य उत्पादन मशीन यांचा समावेश करता येईल. साधारणपणे भारतीय बाजारपेठेमध्ये अगरबत्ती बनवण्याच्या यंत्राची किंमत 35 हजारापासून ते एक लाख 75 हजार रुपयांपर्यंत आहे.

या मशीनच्या माध्यमातून तुम्ही एकाच मिनिटात दीडशे ते 200 अगरबत्ती बनवू शकतात. परंतु तुम्हाला जर सुरुवातीला मशीनचा वापर न करता अगरबत्ती व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही हाताने देखील अगरबत्ती बनवू शकता व या पद्धतीचा व्यवसाय तुम्ही अगदी 15000 रुपयांपेक्षा कमी भांडवलात सुरू करू शकता.

 अगरबत्ती बनवण्यासाठी लागेल हा कच्चामाल

आता कुठलाही व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा उत्पादन निर्मिती करिता तुम्हाला कच्चामाल लागतो. त्याच पद्धतीने अगरबत्ती बनवण्याकरिता देखील तुम्हाला काही कच्चामाल लागतो. यामध्ये प्रामुख्याने गम पावडर, चारकोल पावडर, बांबू, सुगंधी तेल, सेंट्स, पाणी, फुलांच्या पाकळ्या, चंदनाचे लाकूड,

जिलेटिन पेपर, शॉ डस्ट आणि पॅकिंग साहित्य इत्यादींचा यामध्ये समावेश होतो. या सगळ्या कच्च्या मालाचा पुरवठा बाजारातील चांगल्या पुरवठादारांच्या माध्यमातून तुम्ही करू शकतात. याकरिता तुम्ही अगोदर या व्यवसायात असलेल्या लोकांची मदत घेऊन बाजारातील सर्वोत्तम अशा पुरवठादारांशी संपर्क साधू शकतात.

 अगरबत्ती व्यवसाय वाढवण्यासाठी काय कराल?

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या व्यवसायामध्ये तुम्हाला जम बसवायचा असेल तर महत्वाचे म्हणजे अगरबत्त्यांचे आकर्षक डिझाईन पॅकिंगवर भर देणे गरजेचे आहे. या व्यवसायमध्ये तुमचे पॅकिंग जितके आकर्षक असेल तितकेच उत्पादन हे चांगले विकले जाते. याकरिता तुम्ही पॅकेजिंग क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेऊन तुमच्या अगरबत्तीच्या आकर्षक पॅकिंग बनवणे गरजेचे आहे. तसेच मार्केटिंग हा तर कुठलाही व्यवसायाचा प्राण असतो.

त्याचप्रमाणे अगरबत्ती व्यवसायात वाढ करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या अगरबत्ती उत्पादनाची माहिती किंवा जाहिरात वर्तमानपत्रातून, टीव्हीच्या माध्यमातून किंवा इतर सोशल मीडियाचा वापर करून करणे खूप गरजेचे आहे. जर तुम्हाला ऑनलाईन वेबसाईट बनवणे शक्य झाले तर तुम्ही ती देखील बनवू शकतात व त्याद्वारे तुमच्या उत्पादनाची संपूर्ण माहिती वेबसाईटवर टाकून त्या माध्यमातून विक्री वाढवू शकता.

 अगरबत्ती व्यवसायाची नोंदणी अशा पद्धतीने करावी

हा व्यवसाय जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर सुरू करायचा असेल तर तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. नेमकी तुमची कंपनीचा आकारानुसार तुम्ही तुमच्या व्यवसायाची आरओसी मध्ये नोंद करणे गरजेचे आहे.या ठिकाणी नोंद केल्यामुळे गुंतवणूकदारांचा तुमच्या कंपनीवर विश्वास बसतो आणि काही कागदपत्रांच्या बाबतीत तुम्हाला याचा बेनिफिट मिळतो.

व्यवसायाचा परवाना मिळवण्यासाठी तुम्हाला स्थानिक प्राधिकरणाकडे अर्ज करणे गरजेचे आहे व त्या ठिकाणाहूनच तुम्हाला बिजनेस पॅन कार्ड मिळेल. बँकेत चालू बँक खाते उघडणे गरजेचे आहे. त्यासोबतच एसएसआय युनिटमध्ये नोंदणी करावी. तसेच व्हॅट नोंदणीकरिता अर्ज करावा व ट्रेडमार्कची देखील नोंदणी करून घ्यावी.

या ठिकाणी नोंदणी केल्यामुळे तुमचा ब्रँडचे नाव सुरक्षित राहते. मोठ्या प्रमाणावर जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्या उत्पादन युनिटकरिता प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून एनओसी घेणेदेखील गरजेचे आहे व कारखान्याचा परवाना देखील घ्यावा.

 अशाप्रकारे अधिकची माहिती घेऊन तुम्ही हा व्यवसाय सुरू करून खूप चांगला नफा मिळवू शकतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts