Business Idea : व्यवसाय सुरु करणे म्हटले की सर्वात महत्वाचे असते ते भांडवल. मात्र आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण तुम्ही हा व्यवसाय कमी गुंतवणुकीमध्ये सुरु करू शकता.
हा व्यवसाय तुम्ही नोकरीसोबतही करू शकता. जेणेकरून तुमचे उत्पन्न हे डबल होईल. आपण खोबरेल तेलाच्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत. तुम्ही नारळापासून तेल काढण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. ही अशी गोष्ट आहे, ज्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अन्नापासून ते औषध आणि सौंदर्य उत्पादने बनवण्यासाठी याचा वापर केला जातो.
खोबरेल तेल केसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. हे त्वचेसाठी खूप चांगले मानले जाते. एकंदरीत खोबरेल तेल हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. नारळाचे तेल सामान्यतः सर्व घरांमध्ये आढळते. संपूर्ण औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असणारे हे उत्पादन आहे.
हा व्यवसाय कसा सुरु करावा?
खोबरेल तेलाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कच्चा माल लागतो. यासोबतच वूड प्रेस मशीन, एचपी मोटर, फिल्टर मशीन, स्टोरेज टँक आदी गोष्टींची आवश्यकता आहे. या सर्व गोष्टी तेल बनवण्यासाठी लागतात.
खोबरेल तेल बनवण्यासाठी नारळ वुड प्रेस मशीनमध्ये जास्त वेळ ठेवून बारीक करून घेतले जाते. नंतर ते कुस्करून त्यातून तेल काढले जाते. यानंतर मिक्सर कोल्ड प्रेसमध्ये ठेवला जातो. नंतर ते थंड होण्यासाठी उघडे ठेवले जाते. थंड झाल्यावर ते फिल्टर मशीनमध्ये टाकून स्वच्छ केले जाते. त्यानंतर ते बाटल्यांमध्ये भरून बाजारात आणले जाते.
खर्च किती होईल?
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला मशिन खरेदी करून जागा खरेदीवर खर्च करावा लागतो. या व्यवसायात तुम्हाला 15 ते 20 लाख रुपये खर्च करावे लागतात. यासाठी तुम्ही कर्जही घेऊ शकता.
कमाई किती होईल?
हा व्यवसाय तुम्ही गाव किंवा शहर दोन्ही ठिकाणी सुरु करू शकता. हा व्यवसाय वर्षभर चालणारा आहे. यामध्ये कमाई देखील खूप जास्त आहे. त्यासाठी एकदाच गुंतवणूक करावी लागते. त्याच वेळी, सर्व खर्च काढून तुम्ही वार्षिक 3 लाख रुपयांहून अधिक कमवू शकता. यानंतर जसा व्यवसाय वाढेल तशी कमाई वाढतच राहील. त्यामुळे तुम्हाला या व्यवसायातून हळूहळू चांगला नफा मिळेल.