Business Idea : जर तुम्हाला नवीन सुरु करायचा असेल आणि तुम्हाला सुरु करायचा ते समजत नसेल तर तुमच्यासाठी बातमी कामाची आहे. असा एक व्यवसाय आहे जो तुम्ही कुठेही आणि कमी खर्चात सुरु करू शकता. त्यातून तुम्हाला चांगली कमाई करता येईल.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या व्यवसायासाठी तुम्हाला कोणतेही प्रशिक्षण घ्यावे लागत नाही. आता तुम्ही तुमचा स्टेशनरी व्यवसाय कुठेही सुरु करू शकता. संपूर्ण वर्षभर या व्यवसायाला खूप मागणी असते. त्यामुळे तुम्हाला चांगले कमाई करता येईल.
विद्यार्थ्यांना ओळखपत्र, लॅमिनेशन असणारे ओळखपत्र, पीव्हीसी असणारे ओळखपत्र, बटन बॅच, मॅग्नेट बॅच आदींचीही शाळांमध्ये खूप गरज आहे. या वस्तूंचा व्यवसाय करून आता तुम्हाला चांगला नफा कमवता येईल.
कुठे सुरु करता येईल व्यवसाय
तुम्ही मोठ्या शहरांपासून लहान शहरांपर्यंत आणि अगदी खेड्यांपर्यंत शाळा पाहत असाल. आता तुम्ही तुमचा स्टेशनरी व्यवसाय कुठेही सुरु करू शकता. तुम्ही तुमच्या स्टेशनरी शॉपमध्ये, शाळेच्या गरजेनुसार टी-शर्ट, कॅप्स आणि इतर गोष्टी देखील ठेवू शकता. कारण अशा वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या व्यवसायात यश मिळण्याची खूप शक्यता जास्त आहे.
किती होईल नफा?
तुम्हाला तुमचा व्यवसाय पुढे न्यायाचा असेल आणि त्यांच्या मागणीनुसार उत्पादनांचा पुरवठा करण्यासाठी तुम्हाला शाळांशी देखील करार करता येईल. अशा उत्पादनांमध्ये मार्जिन खूप जास्त असते. तुम्ही 5 रुपयांना बनवलेले पीव्हीसी ओळखपत्र 35 ते 50 रुपयांना विकू शकता. जर तुमचा व्यवसाय यशस्वी झाला तर तुम्ही ते बनवण्यासाठी मशीन्स स्थापित करू शकता. त्यानंतर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला ऑर्डर जास्त मिळू लागतील.
गुंतवणूक
समजा तुम्ही हा व्यवसाय सुरु करणार असाल तर सर्वात अगोदर तुम्हाला ‘शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट’ अंतर्गत नोंदणी करावी लागणार आहे. हा व्यवसाय तुम्ही कमी भांडवल गुंतवूनही चालू करू शकता. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला किमान 50 ते 60 हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत.
हे लक्षात घ्या की दुकान उघडण्यासाठी ठिकाण खूप गरजेचे असते. शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांजवळ स्टेशनरीची दुकाने तुम्ही चालू करू शकता. या वस्तू घाऊक किमतीत खरेदी करून, तुम्ही शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन त्या किरकोळ किमतीत विकू शकता. अशा प्रकारे हळूहळू तुमचा व्यवसाय वाढेल.