आर्थिक

Business Idea : कमी गुंतवणुकीत घरबसल्या सुरु करा ‘हा’ व्यवसाय, मिळेल दुप्पट परतावा, कसे ते जाणून घ्या

Business Idea : व्यवसाय सुरु करण्याच्या तयारीत असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही बाजारात खूप चालणारा व्यवसाय सुरु करू शकता, अगदी कमी किमतीत. त्यासाठी तुम्हाला कोठेही जाण्याची गरज नाही. घरीबसुन तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता.

बाजारात एक असा व्यवसाय आहे ज्याला संपूर्ण वर्षभर मागणी असते. तुम्ही घरबसल्या मोबाईलसाठी टेम्पर्ड ग्लास बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता.हे लक्षात घ्या टेम्पर्ड ग्लास बनवण्यासाठी कच्चा माल खूप गरजेचा असतो.

यासाठी तुम्हाला अँटी सॉक स्क्रीन प्रोटेक्टर फिल्म आणि ऑटोमॅटिक टेम्पर्ड ग्लास मेकिंग मशीन खरेदी करावी लागणार आहे. ज्यात सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून अॅप्लिकेशनद्वारे काम करते. त्यानंतर टेम्पर्ड ग्लास पॅक करण्यासाठी आणि विकण्यासाठी, तुम्हाला पॅकिंग सामग्री देखील खरेदी करावी लागणार आहे.

घरबसल्या बनवा टेम्पर्ड ग्लास

टेम्पर्ड ग्लास मेकिंग मशीनच्या मदतीने टेम्पर्ड ग्लास सोप्या पद्धतीने बनवता येतो. त्याला सॉफ्टवेअर देखील जोडलेले असून जे अनुप्रयोगाद्वारे नियंत्रण करता येते. या मशिनच्या साहाय्याने टेम्पर्ड ग्लास बनवण्यासाठी तुम्हाला पूर्वी या मशीनमध्ये टेम्पर्ड ग्लास शीट बसवून घ्या.

तुम्हाला मशिन चालू करून ते तुमच्या मोबाईल आणि लॅपटॉपला जोडावे लागणार आहे. तुम्हाला या मशीनचे अॅप्लिकेशन डाउनलोड करावे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला कोणताही टेम्पर्ड ग्लास बनवायचा आहे त्या पद्धतीने अॅपमध्ये त्या प्रकारची रचना करावी लागते. स्वयंचलित टेम्पर्ड ग्लास तयार होईल. तुम्ही नंतर ते पॅक करून विक्रीसाठी पाठवू शकता.

किंमत

हे लक्षात घ्या की कोणताही व्यवसाय सुरू करत असताना त्यापूर्वी परवाना घेणे गरजेचे असते. त्यामुळे तुम्हाला नंतर कोणत्याही अडचण येणार नाही. हे मशीन 1 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहे. काही किरकोळ खर्च जोडून तुम्ही हा व्यवसाय 1.50 लाख रुपयांपेक्षा कमी खर्चात घरबसल्या सहज चालू करू शकता.

कमाई

टेम्पर्ड ग्लास तयार करण्यासाठी 10-15 रुपये खर्च येतो. बाजारात ती 100 रुपयांपासून 200 रुपयांना विकतात. एकूणच, टेम्पर्ड ग्लासमधून थेट 80 रुपयांपर्यंत सहज कमाई होईल.

टेम्पर्ड ग्लासेस

बाजारात प्लास्टिक गार्ड, स्क्रीन गार्ड, 2D, 3D, 4D, 5D, 9D, 11D असे अनेक टेम्पर्ड ग्लासेस असून या सर्वांच्या किमती वेगळ्या आहे. ज्यात जास्त थर आहे ती काच फोनमध्ये बसवावी. म्हणजेच ज्या काचेची जाडी चांगली आहे. उंच थरामुळे मोबाईल कुठेतरी पडला तर स्क्रीनवर दाब कोणत्याही प्रकारचा दबाव येत नाही.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts