आर्थिक

Business Idea : घरबसल्या कोणत्याही गुंतवणूकीशिवाय सुरु करा ‘हा’ व्यवसाय, महिन्यातच कराल लाखोंची उलाढाल

Business Idea : जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरु करण्याच्या तयारीत असाल आणि तुम्हाला कोणती कल्पना नसेल तर बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची आहे.या आता तुम्ही घरबसल्या तुमचा व्यवसाय सुरु करू शकता. विशेष म्हणजे तुम्हाला यात गुंतवणूकीची गरज पडत नाही.

तुम्ही कोणत्याही गुंतवणूकीशिवाय घरच्या घरीच हा शानदार व्यवसाय सुरु करू शकता. सर्वात आनंदाची बाब म्हणजे तुम्हाला महिन्यातच लाखो रुपयांची कमाई करता येईल. काय आहे हा व्यवसाय? त्यात कशी गुंतवणूक करावी? जाणून घ्या.

हा वेस्ट मटेरिअलचा व्यवसाय असून आता तुम्ही हा व्यवसाय घरगुती रद्दीपासून सुरू करू शकता. टाकाऊ वस्तूंपासून किती पैसे कमावता येतील याची तुम्हाला कल्पनाही करता येणार नाही.संपूर्ण जगभरात प्रत्येक वर्षी २ अब्ज टनांपेक्षा जास्त कचरा निर्माण होतो. समजा आपण भारताबद्दल बोलायचे झाले तर 277 दशलक्ष टनांपेक्षा जास्त कचरा निर्माण होतो. अशा परिस्थितीत या व्यवसायामध्ये खूप वाव आहे.

टाकाऊ वस्तूंचा कसा करतात?

आपण आता रद्दीपासून खूप काही करू शकता. उदाहरणार्थ, टायरपासून बसण्याची खुर्ची तयार करता येते. Amazon वर त्याची किंमत एकूण 700 रुपये इतकी आहे. तर कप, लाकडी कलाकुसर, चष्मा, किटली, कंगवा आणि इतर घर सजावटीच्या वस्तू तयार केल्या जातात. घराच्या सजावटीच्या वस्तू, दागिने, पेंटिंग्ज यासारख्या वस्तूही त्यातून तयार केल्या जातात. भंगार व्यवसायातून अनेकांनी आपले भविष्य सुरक्षित केले असून आज ते लाखो रुपयांचा नफाही कमावत आहेत.

अशाप्रकारे करा सुरुवात

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात अगोदर तुमच्या घराभोवती टाकाऊ वस्तू गोळा करा. जर तुम्हाला हवे असेल तर महापालिकेकडूनही कचरा उचलू शकता. अनेक ग्राहक टाकाऊ साहित्य देतात, तुम्ही त्यांच्याकडून खरेदी करू शकता.

आता ती रद्दी स्वच्छ करून वेगवेगळ्या वस्तूंचे डिझायनिंग आणि कलरिंग करून घ्या. इतकेच नाही तर तुम्ही आता कल्पनांसाठी इंटरनेटवर अनेक सर्जनशील व्हिडिओ पाहू शकता. तसेच शेवटी मार्केटिंगचे काम सुरू होते. ई-कॉमर्स कंपन्या Amazon आणि Flipkart वर तुम्ही त्यांची विक्री करू शकता.

25 वर्षाचा मुलगा झाला मॉडर्न कबाडीवाला

25 वर्षीय मुकुल छाबरा याने लोकांच्या घरातून भंगार गोळा करण्यास सुरुवात केली असून त्याची मासिक विक्री 27.5 लाख रुपये इतकी आहे. हे लक्षात घ्या की मुकुलने ScrapUncle नावाचा स्टार्टअप सुरू केला असून ScrapUncle वेबसाइट आणि अॅपद्वारे स्क्रॅप रिसायकलिंग सेवा प्रदान करत आहे. शिवाय ग्राहक त्यांच्या घरातून किंवा कार्यालयातून भंगार उचलण्यासाठी प्रशिक्षित, सत्यापित एजंट बुक करू शकतात.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts