आर्थिक

Business Idea : कमी गुंतवणुकीत आजच सुरु करा ‘हा’ वर्षभर मागणी असणारा व्यवसाय, महिन्याला कराल 50 हजारांची कमाई

Business Idea : जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याच्या तयारीत असाल आणि तुमच्याकडे भांडवल कमी असेल तर बातमी तुमच्यासाठी कामाची आहे. सध्या असा एक व्यवसाय आहे जो तुम्ही कमी किमतीत चालू करू शकता.

शिवाय त्याला संपूर्ण वर्षभर मागणी असते. जर तुमच्याकडे पुरेशा प्रमाणात पैसे नसतील तर काळजी करू नका. आता तुम्ही सरकारच्या मदतीने हा व्यवसाय सुरु करू शकता. नफा जास्त मिळत असल्याने अनेकजण हा व्यवसाय सुरु करत आहेत.

मध जॅम बनवण्याचा व्यवसाय

मधाची त्याच्या पौष्टिक गुणधर्मांसाठी ओळख आहे. तो विविध अन्न आणि औषधी अनुप्रयोगांमध्ये वापर करण्यात येतो. मधाबद्दल वाढत्या जागरूकतेमुळे, देशात वेगवगेळ्या मूल्यवर्धित उत्पादनांना चांगली मागणी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वैविध्यपूर्ण उत्पादनांत मधाचा वापर केला तर त्याचा फायदा होईल. यामुळे मधाची विक्री वाढेल आणि मधमाशीपालकांच्या उत्पन्नात वाढ होईल.

हनी जॅम बनवण्याची प्रक्रिया

मध जॅम बनवण्याची प्रक्रिया सरळ आणि खूप सोपी आहे. यासाठी सर्वात अगोदर 1 अननस, 3 आंबे, 1 मध्यम आकाराची पपई, 5 पेरू घ्या. ते स्वच्छ करून 10 मिनिटे पाण्यात उकळा. अमिक्सर ग्रँडरच्या मदतीने या फळांचा लगदा बाहेर काढावा. यानंतर तांब्याच्या तळाशी असणाऱ्या स्टीलच्या भांड्यात फळांचा लगदा, साखर आणि सायट्रिक ऍसिड टाकून ते 5 मिनिटे उकळवून घ्यावे.

यामध्ये 25 मिली पेक्टिन घालून ते 2 मिनिटे उकळवा. त्यानंतर त्यात 2 ग्रॅम पोटॅशियम मेटाबिसल्फाईट प्रिझर्वेटिव्ह्ज घाला आणि थोडेसे पाणी घातल्यानंतर कंटेनर घट्ट बंद करावा. ज्यावेळी ते 65 अंश सेल्सिअस पर्यंत थंड होते त्यावेळी त्यामध्ये मध घालून चांगले मिसळा. पुढे 500ml काचेच्या बाटल्यांमध्ये भरून सील करा.

खर्च

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या अहवालानुसार, तुम्हाला जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी तुमच्याकडे स्वतःची जागा असावी. समजा तुमच्याकडे स्वतःची जागा नसल्यास तुम्ही ती भाड्याने घेऊ शकता. उपकरणे खरेदीसाठी तुम्हाला 1.50 लाख रुपये खर्चावे लागतील. तुमच्याकडे एकूण 1.65 लाख रुपयांचे खेळते भांडवल असावे. अशा प्रकारे हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुमच्याकडे एकूण 3,15,000 रुपये असावे.

उत्पन्न

समजा तुम्ही 100 टक्के क्षमता वापरून उत्पादन केल्यास तुम्हाला वार्षिक 7 लाख रुपयांचे उत्पादन घेता तेली. अंदाजित विक्री खर्च 17,50,000 रुपये इतका असू शकतो. एकूण अधिशेष 7,21,000 रुपये असणार आहे. अंदाजे निव्वळ अधिशेष वार्षिक 7,06,000 रुपये एकंदरीत तुम्हाला प्रत्येक महिन्याला एकूण 60,000 रुपये कमवता येतील.

KVIC ने आपल्या अहवालात असे म्हटले आहे की हे आकडे फक्त सूचक असून ते वेगवेगळ्या ठिकाणी बदलण्याची शक्यता आहे. समजा तुम्ही इमारत बांधण्यासाठी खर्च करण्यापेक्षा तुम्ही इमारत भाड्याने घेतली तर तुमच्या प्रकल्पाचा खर्च कमी होऊ शकतो. भांडवली खर्चावरील व्याजही कमी होऊन तुमचा नफा वाढेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts