आर्थिक

Business Idea Tips : श्रीमंत होण्याची उत्तम संधी ! सुरु करा हा व्यवसाय मिळेल लाखोंचा बंपर नफा, जाणून घ्या ते कसे

Business Idea Tips : देशातील तरुणांमध्ये व्यवसाय करण्याची आवड असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक तरुण नोकरी न करता व्यवसाय करत आहेत. आजही तरुणांना व्यवसाय करायचे आहेत. मात्र कोटा व्यवसाय करावा हे अनेकांना समजत नाही.

तुम्हालाही नोकरी न करता व्यवसाय करायचा असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. तुम्ही देखील शेतीमध्ये व्यवसाय करून चांगला नफा कमवू शकता. आजही अनेकजण पारंपरिक शेती करत आहेत. मात्र आधुनिक शेती करून तुम्ही लाखोंचा नफा कमवू शकता.

भारतात हळूहळू किवीची शेती करण्यास सुरुवात केली आहे. नागालँडमध्ये किवीची सर्वाधिक लागवड केली जाते. किवी चीनचे मूळ फळ आहे. मात्र आता नागालँडला केंद्र सरकारने किवी राज्याचा दर्जा मिळवून दिला आहे.

ईशान्येकडील राज्यांमध्ये किवी पिकाची शेती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. मात्र किवी पिकाची लागवड करण्यात नागालँडच्या तुलनेत ही राज्ये अजूनही मागे आहेत. किवीची लागवड करून तुम्ही एक हेक्टर बागेतून 24 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवू शकता. त्यामुळे भाजीपाला पिकातून देखील तुम्ही एका वर्षात इतके उत्पन्न मिळवू शकत नाही.

किवीची लागवड करून तुम्ही देखील चांगली कमाई करू शकता. किवी फळाची लागवड करण्यासाठी जास्त तापमानाची गरज नाही. ज्या ठिकाणी तापमान 30 अंशांच्या वर जात नाही अशा ठिकाणी किवीची लागवड केली जाऊ शकते.

डोंगराळ आणि थंड हवेच्या ठिकाणी शेतकरी किवीची लागवड करू शकतात. सध्या किवीची लागवड कमी प्रमाणात असल्याने बाजारात त्याला भाव देखील चांगल्या प्रमाणात मिळत आहे. तसेच किवीचे फळ औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असल्याने त्याला बाजारात चांगली मागणी आहे. किवी लागवडीतून तुम्ही दरवर्षी लाखोंची आर्थिक कमाई करू शकता.

किवीचे फायदे

किवी फळामध्ये संत्र्यापेक्षा 5 पट जास्त व्हिटॅमिन सी असते. किवीमध्ये 20 हून अधिक पोषक घटक आढळतात त्यामुळे ते शरीरास फायदेशीर आहे. किवीमध्ये जीवनसत्त्वे, पोटॅशियम, तांबे आणि फायबर देखील मोठ्या प्रमाणात आढळते.

70 ग्रॅम ताज्या किवी फळामध्ये व्हिटॅमिन सी 50 टक्के, व्हिटॅमिन के 1 टक्के, कॅल्शियम 10 टक्के, फायबर 8 टक्के, व्हिटॅमिन ई 60 टक्के, पोटॅशियम 6 टक्के आढळून येते. किवी खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts