Business Idea:- बरेच व्यक्ती एखाद्या खाजगी कंपनीत किंवा सरकारी नोकरीला असतात. परंतु या माध्यमातून मिळणाऱ्या पगारात त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण होत नाही किंवा पैसा अपूर्ण पडतो. त्यामुळे बरेच जण साईड इन्कम करिता काही व्यवसाय देखील करतात. तसेच काही व्यक्ती हे नोकरी नसल्यामुळे कुठलातरी व्यवसाय करावा यासाठी व्यवसायाच्या शोधामध्ये असतात.
परंतु आपली आर्थिक परिस्थिती ओळखून त्या व्यवसाय करता लागणारी गुंतवणूक याचा विचार हा कुठलाही व्यवसाय सुरू करताना प्रत्येक जण करत असते. तसेच आपल्याला जो काही व्यवसाय उभारायचा आहे त्या व्यवसायाला मागणी किती आहे हा देखील प्रमुख मुद्दा असतो. त्यामुळे व्यवसाय सुरू करण्याआधी हे प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतात. त्या अनुषंगाने आपण या लेखामध्ये असा एक व्यवसाय पाहणार आहोत जो तुम्ही कमी भांडवलात सुरू करून महिन्याला चांगला नफा मिळवू शकतात.
टी–शर्ट प्रिंटिंगचा व्यवसाय देईल तुम्हाला महिन्याला चांगली कमाई
टी-शर्ट प्रिंटिंगचा व्यवसाय हा तुम्ही कमीत कमी गुंतवणुकीतून घरी बसून म्हणजेच घरातून सुरु करू शकतात. सध्या हे फॅशनचे युग असल्यामुळे टी-शर्ट हे प्रत्येकाचे आवडते असल्यामुळे याला मागणी देखील तितकीच आहे.
त्यामुळे टी-शर्टची विक्री देखील बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर होते हे आपल्याला माहिती आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी साधारणपणे तुम्हाला 70000 रुपये गुंतवणे गरजेचे असते. परंतु या गुंतवणुकीतून तुम्ही प्रत्येक महिन्याला 40 ते 50 हजार रुपये अगदी सहजपणे कमवू शकतात.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक गोष्टी
तुम्हाला जर टी-शर्ट प्रिटिंग व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला प्रिंटर तसेच हिट प्रेस, कम्प्युटर, कागद आणि इतर कच्चा माल म्हणून टी-शर्ट लागतील. तुम्हाला जर छोट्यात छोट्या स्केलवर काम करायचे असेल तर तुम्ही दोन ते पाच लाख रुपयांमध्ये गुंतवू शकतात. यामध्ये तुम्हाला सर्वात स्वस्त मशीन हे मॅन्युअल प्रकारांमध्ये मिळते व यामध्ये एक टी-शर्ट एक मिनिटात प्रिंटिंग करून तयार केले जाऊ शकते.
प्रिंट केलेल्या टी–शर्ट यांची विक्री कशी करावी?
आपल्याला माहित आहे की ऑनलाईन प्लेटफॉर्मच्या माध्यमातून अनेक व्यवसाय वाढीस लागले असून तुम्ही देखील या माध्यमातून तुमच्या टी-शर्ट प्रिंटिंगचा स्वतःचा ब्रँड तयार करू शकतात आणि कुठल्याही प्रकारच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून टी-शर्ट विक्री करू शकतात.
जस जसा तुमचा व्यवसाय वाढीस लागेल तसं तसं तुम्ही तुमचा व्यवसायाचा विस्तार करू शकतात. जर तुम्ही चांगला दर्जा आणि गुणवत्ता राखली तर मोठ्या संख्येने टी-शर्ट प्रिंट करून त्याची विक्री करू शकतात व जस जशी तुमची विक्री वाढत जाईल तशी तुम्ही टी-शर्ट प्रिंटिंगची चांगली मशीन खरेदी करून जास्त प्रमाणामध्ये टी-शर्ट प्रिंटिंग करू शकता व विक्री वाढवू शकतात.
टी–शर्ट प्रिंटिंग व्यवसायातून किती कमाई करता येऊ शकते?
जर आपण याकरिता सामान्य प्रिंटिंग मशीनची किंमत पाहिली तर ते 50 हजार रुपये आहे. तसेच यामध्ये छपाईकरिता सामान्य दर्जाच्या सफेद कलरच्या टी-शर्ट ची किंमत 120 रुपये असते व तो टी-शर्ट प्रिंट करण्याची किंमत एक ते दहा रुपयाच्या दरम्यान येते.
जर तुम्हाला यामध्ये बारीक पेंटिंग हवी असेल तर त्याची किंमत 20 ते 30 रुपये पर्यंत जाते. परंतु अशा पद्धतीने प्रिंट केलेले टी-शर्ट तुम्ही कमीत कमी दोनशे ते 250 रुपयांना विकू शकतात. म्हणजेच डायरेक्ट तुम्ही ग्राहकांना टी-शर्ट विक्री केले तर 50 टक्के नफा या माध्यमातून तुम्हाला मिळू शकते आहे.