आर्थिक

Business News: रिलायन्स पेट्रोल पंपाचे डीलर होण्याचे सुवर्णसंधी! अशा पद्धतीने व्हा रिलायन्स पेट्रोल पंपाचे डीलर, वाचा माहिती

Business News:- अनेक जणांची व्यवसाय करण्याची इच्छा असते व अनेक छोटे-मोठे व्यवसाय करण्याचा विचार व्यक्तींच्या मनामध्ये येत असतो. यामध्ये अनेक प्रकारचे छोटे व्यवसाय म्हणजेच यासाठी लागणारी गुंतवणूक कमीत कमी असते असे व्यवसाय बरेच जण करतात. परंतु मोठी गुंतवणूक आणि नफा या दृष्टिकोनातून बरेच जण काही वेगळा व्यवसाय उभारण्याचा विचार करतात.

या मोठ्या गुंतवणूक असलेल्या व्यवसायांच्या यादीमध्ये बऱ्याच जणांची इच्छा स्वतःचा पेट्रोल पंप सुरू करण्याची देखील असते. परंतु नेमका पेट्रोल पंप कसा सुरू करावा? त्यासाठीची नेमकी प्रक्रिया काय असते? इत्यादी बद्दल पुरेशी माहिती नसते. तसेच पेट्रोल पंपाचा विचार केला तर यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे पेट्रोल पंप हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात व त्यांची प्रक्रिया देखील वेगवेगळी असते. आपल्याला साधारणपणे हिंदुस्तान पेट्रोलियम किंवा इंडियन ऑइल यासारख्या कंपन्यांच्या पेट्रोल पंपाची नावे माहिती असतात.

त्यासोबतच अलीकडील काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झालेला पेट्रोल पंप म्हणजे रिलायन्स पेट्रोल पंप होय. रिलायन्स पेट्रोल पंपाचा विचार केला तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या मालकीचा हा  उद्योग असून आता त्यांनी नवीन पेट्रोल पंप व्यवसायात येणाऱ्या व्यक्तींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. या संधीच्या माध्यमातून तुम्ही रिलायन्स पेट्रोल पंपाचे डीलर बनवून चांगली कमाई करू शकतात. नेमकी रिलायन्स पेट्रोल पंपाची डीलरशिप कशी घ्यावी? याबद्दलची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 रिलायन्स पेट्रोल पंपाचे डीलर होण्याची सुवर्णसंधी

तुमची देखील पेट्रोल पंप उघडून चांगला पैसा कमवायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी एक सुवर्णसंधी दिली असून तुम्ही या संधीचे सोने करून रिलायन्स पेट्रोल पंपाचे डीलर होऊ शकतात. तुम्हाला देखील रिलायन्स पेट्रोल पंपाची डीलरशिप घ्यायची असेल तर त्याकरिता सर्वात अगोदर तुम्हाला….

1-jio-BP https://partners.jiobp.in/ या अधिकृत लिंक वर जावे लागेल.

2- या पेजवर गेल्यानंतर त्या ठिकाणी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट सबमिट करावे लागेल. या ठिकाणी गेल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होते व या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव तसेच तुमचा मेल आयडी तुमचा मोबाईल नंबर असा सर्व महत्त्वाचा तपशील नमूद करणे गरजेचे आहे.

3- व्यवसाय करिता तुम्ही अर्ज केल्यानंतर अर्जदारांना वेबसाईट स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यामध्ये आमच्याशी संपर्क साधा या चिन्हावर जावे लागेल व पुढील पर्यायावर क्लिक करून व्यवसाय संदर्भात माहिती द्यावी लागेल.

4- या ठिकाणी गेल्यावर स्क्रीनवर एक फॉर्म तुम्हाला दिसेल व या फॉर्ममध्ये अर्जदारांना व्यवसायाशी संबंधित सर्व वैयक्तिक तपशील तसेच व्यवसायाकरिता आवश्यक केलेल्या जमिनीचे क्षेत्र म्हणजेच आकार आणि तिचे स्थान देखील तुम्हाला नमूद करावे लागेल. नंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी व सर्व संपर्क डिटेल्स तुम्हाला नमूद करावे लागतील.

5- नंतर कंपनीच्या माध्यमातून या फॉर्मचे पुनरावलोकन केले जाते व प्रक्रिया पुढे नेण्यासाठी कंपनीचा प्रतिनिधी डायरेक्ट अर्जदाराशी संपर्क साधतो.

6- तसेच पेट्रोल पंपाचे बांधकामाकरिता कच्चामाल, बांधकामाचे साहित्य आणि अगदी ब्रांडेड फर्निचर तसेच स्टॅन्ड आणि पीओएस मशीन इत्यादी उपकरणे तुम्हाला दाखवावे लागतील.

7- पेट्रोल पंपाचे बांधकाम सुरू झाल्यानंतर बांधकामाची प्रगती कशी आहे यावर लक्ष ठेवण्याकरिता रिलायन्स पेट्रोलियमचे कर्मचारी वेळोवेळी तपासणी करतात आणि संबंधित फ्रॅंचाईजीला अंतिम प्रमाणपत्र देण्यापूर्वी पंप कर्मचाऱ्यांची मुलाखत देखील घेतली जाते व त्यानंतर अर्जदारास काम सुरू करता येते.

 या गोष्टी असतील तरच पेट्रोल पंप सुरू करता येईल

रिलायन्स पेट्रोल पंप सुरू करण्याकरिता किमान 800 स्क्वेअर फुट जागा आणि तीन पंप व्यवस्थापक असणे गरजेचे आहे. तसेच स्वच्छ असे स्वच्छतागृह आवश्यक असणार असून त्याकरिता कमीत कमी 70 लाख रुपयांचे बजेट लागणार आहे. तुम्हाला महामार्गावर रिलायन्स पेट्रोल पंप उघडायचा असेल तर त्याकरिता 1500 स्क्वेअर फुट जागा असणे आवश्यक असून हवा भरण्याकरिता दोन परिचर असणे देखील आवश्यक आहे.

पेट्रोल फिलिंग करिता आठ कर्मचारी असणे आवश्यक आहे. तसेच लागणाऱ्या भांडवलाचा विचार केला तर तुम्हाला लागणाऱ्या जमिनीची किंमत किंवा जमिनीचे भाडे 23 लाख रुपये रिफंडेबल म्हणजेच परत करण्याजोगी सिक्युरिटी ठेव आणि साडेतीन लाख रुपये स्वाक्षरी शुल्क लागते.

अशा पद्धतीने तुम्ही अधिकची माहिती घेऊन स्वतःचा रिलायन्स पेट्रोल पंप उभारू शकतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts