Business Success Story:- गरज ही शोधाची जननी आहे असे म्हटले जाते व ते तितकेच वास्तव सत्य देखील आहे. माणसाला असलेल्या गरजेतून तो ती गरज पूर्ण करण्यासाठी अनेक गोष्ट करत असतो व त्यातूनच काहीतरी नाविन्यपूर्ण असे घडते. बऱ्याचदा यशस्वी झालेल्या व्यवसायांचे माहिती आपण घेतली की आपल्याला जाणवते की सुरुवात अगदी छोट्याशा गरजेतून किंवा कल्पनेतून झालेले असते
व कालांतराने मात्र या छोट्याशा कल्पनेचे किंवा गरजेचे रूपांतर मोठ्या व्यवसायामध्ये झालेले आपल्याला दिसून येते. अगदी याच मुद्द्याला साजेशी अशी यशोगाथा पुण्यात राहणाऱ्या श्वेतांबरी शेटे यांची सांगता येईल. श्वेतांबरी यांनी त्यांना असलेल्या एका गरजेतून व्यवसायाची सुरुवात केली व आज त्यांचा हा व्यवसाय कोटीच्या घरात आहे. त्यांचेच यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.
श्वेतांबरी शेटे यांची यशोगाथा
स्त्रीच्या बाबतीत विचार केला तर ती तिच्या सौंदर्याच्या बाबतीत कायमच जागरूक असते. त्यामुळे केस गळण्याची समस्या असो किंवा केस पांढरे पडणे, चेहऱ्यावर सुरकुत्या तसेच पिंपल्स इत्यादी अनेक समस्यांना प्रत्येक महिलांना तोंड द्यावे लागते. अशा महिलांना जाणवणाऱ्या समस्यांचा विचार करून श्वेतांबरी शेटे यांनी जॅक फ्रुट नावाची कंपनी सुरू केली
व घरातून सुरू केलेली ही कंपनी आज कोटीच्या घरात पोहोचलेली आहे. त्यांच्या या कंपनीच्या माध्यमातून फेस वॉश तसेच फेस मास्क तसेच केस गळतीवरच्या अनेक उपाय केले जातात व त्याचा फायदा देखील अनेक स्त्रियांना झालेला आहे.
अशी केली व्यवसायला सुरुवात
श्वेताबरी या अकाउंट विभागांमध्ये नोकरीला होत्या. परंतु नंतरच्या कालावधीमध्ये प्रेग्नेंसी नंतर डिलिव्हरी झाली व जॉब करणे त्यांना अशक्य झाले. जॉब सोडल्यामुळे त्यांनी अनेक वर्ष घरीच काढले. त्यांच्या घरच्या कुटुंबातील अनेक जणांचे व्यवसायच होते. त्यामुळे श्वेतांबरी यांच्या देखील डोक्यात आले की आपण देखील काहीतरी व्यवसाय करावा.
व्यवसाय कोणता करावा? हे मात्र त्यांना सुचत नव्हते. परंतु व्यवसाय सुरू करावा या उद्दिष्टातून त्यांनी उकडीचे मोदक, सोलकढी तसेच आंबे विकणे त्यांनी सुरू केले. परंतु या व्यवसायातून त्यांना फारसे पैसे मिळत नव्हते. जेव्हा श्वेतांबरी डिलिव्हरी झाल्या तेव्हा त्यांचे सगळे लक्ष त्यांनी त्यांच्या बळावर केंद्रित केले.
या कालावधीमध्ये मात्र त्यांचे जागरण तसेच आजारपण इत्यादी मध्ये गेले. या कालावधीमध्ये मात्र त्यांचे केस खूप गळाले तसेच पांढरे झाले व चेहऱ्यावर डार्क सर्कल तसेच पिंपल्स मोठ्या प्रमाणावर आले. त्यामुळे त्यांनी यावर काहीतरी उपाय करावा म्हणून मार्केटमधून अनेक प्रॉडक्ट आणले.
परंतु या उत्पादनाचा देखील काही फरक पडला नाही असं देखील त्यांनी म्हटले. त्यानंतर मात्र त्यांनी घरामध्ये उटणे बनवणे, तेल बनवणे तसेच शिकाकाईचा शाम्पू बनवून स्वतः तो वापरायला सुरुवात केली. या माध्यमातून त्यांनी फेस पॅक, फेस मास्क देखील तयार केला. या उत्पादनांचा रिझल्ट चांगला आला व हा रिझल्ट पाहून आजूबाजूचे बरेचजण त्यांना विचारायला लागले की तुम्ही कुठला उपाय केला?
उत्पादनांची मागणी दुसरे लोक देखील करायला लागले. त्यानंतर त्या पद्धतीने उत्पादनांच्या ऑर्डर यायला लागल्या. त्यामध्ये त्यांच्या पतीने देखील त्यांना मोलाची मदत केली. या व्यवसायाची टेक्निकली बाजू होती ती त्यांच्या पतीने सांभाळली व प्रोडक्शन तसेच फॉर्म्युलेशन स्वतः श्वेतांबरी यांनी सांभाळले.
अगदी घरामधून काही ऑर्डर घेऊन त्यांनी सुरू केलेला या व्यवसायाचा प्रवास आज कोटीच्या घरामध्ये आहे. त्यांच्या जॅक फ्रुट कंपनीमध्ये नैसर्गिक पद्धतीने उत्पादने बनवले जातात. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी जॅक फ्रुट नावाचे फेस वॉश, फेस मास्क व इतर उत्पादने तयार करतात व या उत्पादनांचा मोठ्या प्रमाणावर फायदा स्त्रियांना होतो. त्यांनी बनवलेले या सगळ्या उत्पादनांना बाजारपेठेत देखील खूप चांगल्या पद्धतीची मागणी आहे.
अशा पद्धतीने स्वतःच्या गरजेतून श्वेतांबरी शेटे यांनी कंपनी सुरू केली व आज ती कोटीच्या घरात पोहोचवली.