New Car Launching : कार घेणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच खास ठरणार आहे. कारण की येत्या तीन दिवसात भारतीय बाजारात एक नवीन कार दाखल होणार आहे. किया ही एक लोकप्रिय कार निर्माती कंपनी 12 जानेवारीला किया सॉनेट फेसलिफ्ट कारची किंमत जाहीर करणार आहे.
खरे तर या गाडीला कंपनीने आधीच लाँच केले आहे. आता या गाडीची किमत 12 जानेवारीला जाहीर केली जाणार आहे. सध्या या गाडीची प्री बुकिंग सुरू आहे. 25000 रुपयात या गाडीची बुकिंग ग्राहकांना करता येणार आहे. जर तुम्हीही ही गाडी खरेदी करू इच्छित असाल तर तुम्ही 25 हजार रुपयात या गाडीचची बुकिंग करू शकणार आहात. दरम्यान आता आपण या गाडीच्या विशेषता अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मजबूत इंजिन मिळणार
Kia Sonet ही कंपनीची एक लोकप्रिय कार आहे. या गाडीची तरुणांमध्ये मोठी क्रेझ आहे. अनेकांचे ही गाडी खरेदी करण्याचे स्वप्न आहे. दरम्यान या गाडीची लोकप्रियता पाहता आता कंपनीने या गाडीचे फेसलिफ्ट वर्जन भारतीय बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या फेसलिफ्ट वर्जन साठीची बुकिंग सुरू झाली असून यात 1.2-लीटर, NA पेट्रोल इंजिन असेल, जे 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनने जोडलेले राहणार आहे.
त्याच वेळी, 1.0-लिटर टर्बो-पेट्रोल मोटर 6-स्पीड मॅन्युअल युनिट किंवा 7-स्पीड डीसीटी युनिटशी जोडलेले असेल. हे 6-स्पीड मॅन्युअल, iMT आणि स्वयंचलित युनिटसह ट्रान्समिशन पर्यायांसह 1.5-लिटर डिझेल इंजिनसह देखील उपलब्ध असेल. ही गाडी किती मायलेज देणार याबाबत अद्याप कंपनीकडून कोणतीच माहिती समोर आलेली नाही. मात्र या गाडीचे मायलेज हुंडाई वेन्यू आणि टाटा नेक्सॉन सारखेच राहू शकते असा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे ही गाडी वेन्यू आणि नेक्सॉन या गाडीशी स्पर्धा करणार आहे.
गाडीचे फिचर्स
फेसलिफ्ट सोनेटमध्ये अनेक अपडेटेड फिचर्स राहणार आहेत. गाडीला पुढे आणि मागे बंपर असतील. नवीन एलईडी हेडलॅम्प आणि टेललाइट्स, एलईडी फॉग लाइट्स, डिस्क ब्रेक्स, नवीन 16-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील आणि टेलगेटवर एलईडी लाइट बार मिळणार आहेत. त्याच्या कलर ऑप्शन्स आणि वेरिएंटबद्दल बोलायचे झाले तर, ही SUV 11 कलर ऑप्शन्स आणि 7 व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार कलर ऑप्शन मिळणार आहे. ही गाडी ग्राहकांना विशेष आवडेल असा कंपनीचा दावा आहे.