मुंबईसारख्या शहरांमध्ये म्हाडाच्या माध्यमातून नागरिकांना स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करता येणे शक्य असते. आपल्याला माहित आहे की, म्हाडा अर्थात महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून घरांसाठी लॉटरी काढण्यात येते व या माध्यमातून लॉटरीत नाव आलेल्या भाग्यवान विजेत्याना घराचा लाभ मिळतो.
परंतु ही सगळी प्रक्रिया म्हाडाच्या अटी व नियमांच्या अधीन राहून पूर्ण करण्यात येते. याच पद्धतीने जर आपण पाहिले तर सध्या महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून 2030 घरांसाठी लॉटरी जाहीर केलेली आहे.
आनंदाची बातमी यामध्ये अशी आहे की, म्हाडाने यामध्ये 370 घरांच्या किमतीत दहा ते 25 टक्क्यांनी कपात केलेली होती व आता म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून मुंबई येथील 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर करण्यात आलेली आहे.
यामध्ये बऱ्याच सदनिकांच्या किमती या जास्त असल्यामुळे त्यांचे दर कमी करण्यात यावेत अशा पद्धतीची मागणी केली जात होती व आता म्हाडाच्या विकास नियंत्रण नियमावली 33(5) व 33(7) व 58 अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून प्राप्त झालेल्या म्हाडाच्या हिश्यातील 370 घरांच्या विक्री किमती 10 ते 25% पर्यंत कमी करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलेला होता व त्यानुसार आता या घरांच्या किमतींमध्ये कपात करण्यात आलेली आहे.
या भागातील घरांच्या किमती झाल्या कमी?
जर आपण कमी किमती झालेले घरे पाहिले तर त्यामध्ये ताडदेव येथील उच्च उत्पन्न गटातील घरांच्या किमती 7.5 कोटी रुपयांवरून सहा कोटी 75 लाख रुपये करण्यात आलेले आहेत.तसेच दादर येथील अल्प उत्पन्न गटातील घरांच्या किमती या एक कोटी 62 लाख रुपये होत्या. त्यामध्ये आता कपात करण्यात येऊन एक कोटी तीस लाख रुपये करण्यात आलेल्या आहेत.
इतकेच नाही तर अंधेरी येथील अल्प उत्पन्न गटातील घरांच्या किमती 1 कोटी 50 लाख रुपयांवरून एक कोटी 18 लाख रुपये करण्यात आलेले आहेत.इतकेच नाहीतर मुलुंड येथील मध्यम उत्पन्न गटातील घरांच्या किंमत एक कोटी 88 लाख रुपये इतकी करण्यात आलेली आहे.
तर बोरिवली येथील अल्प उत्पन्न गटातील एक कोटींच्या घरांच्या किमती 82 लाख तर सांताक्रुज येथील अल्प उत्पन्न गटातील घरांची किंमत एक कोटी वरून 82 लाख रुपये करण्यात आलेली आहे. त्यासोबतच चेंबूर येथील अल्प उत्पन्न गटातील घराची किंमत एक कोटी वरून 80 लाख रुपये करण्यात आलेली आहे.
माझगाव येथील अल्प उत्पन्न गटातील घरांच्या किमती 62 लाख रुपयांवरून 50 लाख इतकी करण्यात आलेले आहे. विक्रोळीतील 86 लाखांच्या घर 70 लाखात तर सांताक्रुज येथील 72 लाखांचे घर 57 लाख रुपयांना करण्यात आलेले आहे.
कुर्ला येथील 37 लाख रुपयांचे घर 29 लाख रुपयांना आता मिळू शकणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या घरांसाठी नोंदणी करण्याची मुदत 19 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.
उत्पन्न गटानुसार कमी झालेल्या किमती
यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किमती 25%, अल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किमती 20 टक्के तर मध्यम उत्पन्न गटातील सदनिकांच्या किमती 15 तर उच्च उत्पन्न गटातील सदनिकांच्या किमती 10 टक्क्यांनी कमी करण्यात आलेल्या आहेत.