आर्थिक

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करून काही वर्षांतच व्हाल श्रीमंत, आजच करा गुंतवणूक…

Post Office Scheme : जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर भरघोस परतावा हवा असेल तर आम्ही तुम्हाला अशा एक योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यात गुंतवणूक करून तुम्ही दुप्पट पैसे कमवू शकता.

सध्याच्या काळात ज्या प्रकारे महागाई वाढत आहे. लोकही गुंतवणुकीत रस दाखवत आहेत. पोस्ट ऑफिसने अशा सर्व लोकांसाठी एक योजना आणली आहे. ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकता.

या महागाईच्या युगात तुम्हीही उत्पन्न वाढवण्याचा विचार करत असाल, तर टपाल विभागाने कोणताही धोका न पत्करता सर्वसामान्यांचे पैसे दुप्पट करण्याची योजना आणली आहे. किसान विकास पत्र मध्ये गुंतवणूक केल्याने, तुमचे पैसे फक्त 9 वर्षे आणि 7 महिन्यांत दुप्पट होतील. किसान विकास पत्रावर दरवर्षी ७.५ टक्के दराने वार्षिक व्याज मिळत आहे.

यामध्ये कोणीही एकाच वेळी गुंतवणूक करू शकतो. गरज पडल्यास अडीच वर्षानंतरही पैसे काढता येतात. तसेच पोस्ट ऑफिसकडे अशा अनेक योजना आहेत ज्या गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवण्याचे काम करत आहेत. मात्र पोस्टाच्या किसान विकास पात्र योजनेत तुम्हाला इतर गुंतवणुकीपेक्षा जास्त व्याज दिला जातो.

पोस्टल विभागाची ही योजना तुम्हाला FD पेक्षा जास्त व्याजाचा लाभ देते. या योजनेत ५ वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास ७.५ टक्के व्याज मिळेल. तर मुदत ठेव मध्ये, 1 वर्षाच्या गुंतवणुकीवर 6.9 टक्के, 2 वर्षाच्या गुंतवणुकीवर 7 टक्के आणि 3 वर्षांच्या गुंतवणुकीवर 7.1 टक्के व्याज मिळते.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts