Bank Holiday On Diwali : दिवाळी सुरु झाली असून, दिवाळीमध्ये नवीन खरेदी आणि बरेच आर्थिक व्यवहार केले जातात. जर तुम्हालाही बँकेशी संबधित काही कामे करायची असतील तर थांबा. कारण आजपासून पुढील सात दिवस बँक बंद राहणार आहेत. जाणून घ्या कुठे ते.
जर तुम्ही पुढील 7 दिवसांत बँकिंगशी संबंधित काम करण्यासाठी शाखेत जाण्याचा विचार करत असाल थांबा. कारण आज म्हणजेच 10 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत काही राज्यांमध्ये विविध कारणांमुळे एकूण 6 दिवस बँका बंद राहतील. यामुळे बँकेच्या सुट्ट्यांची यादी एकदा पाहणे गरजेचे आहे.
कधी असतील बँक बंद
11 नोव्हेंबर: महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी बँक बंद असतात. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवारी साप्ताहिक सुट्टी असते. अशा परिस्थितीत 11 नोव्हेंबर रोजी बँका बंद राहणार आहेत.
12 नोव्हेंबर: उद्या रविवार असल्यामुळे बँक बंद राहणार आहेत. कारण रविवार ही साप्ताहिक सुट्टी आहे. अशा परिस्थितीत बँका बंद राहतील. या दिवशी दिवाळीही साजरी केली जाईल,म्हणजे रविवार असल्याने बँकांमध्ये दिवाळीची अतिरिक्त सुट्टीही यावेळी मिळणार नाही.
13 नोव्हेंबर: ही तारीख सोमवार आहे. या दिवशी गोवर्धन पूजा, लक्ष्मी पूजनामुळे देशातील काही राज्यांमध्ये बँका बंद राहतील. दरम्यान, त्रिपुरा, उत्तराखंड, सिक्कीम, मणिपूर, राजस्थान, यूपी आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये बँक बंद राहणार आहेत.
14 नोव्हेंबर: या दिवशी दिवाळी (बली प्रतिपदा). विक्रम संवत नववर्ष आणि लक्ष्मीपूजनामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील. दरम्यान, या सनानिम्मित गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि सिक्कीम या राज्यांमधील बँक बंद राहणार आहेत.
15 नोव्हेंबर: येत्या बुधवारी भाऊबीज, चित्रगुप्त जयंती तेसच लक्ष्मीपूजा, निंगल चक्कूबा, भ्रात्री द्वितीया हे सन राज्यांमध्ये आहेत. यामुळे या सणानिम्मित सिक्कीम, मणिपूर, उत्तर प्रदेश, बंगाल आणि हिमाचल प्रदेशात बँका बंद राहतील.
येत्या आठवड्यामध्ये राज्यातील बँक दिवाळी उत्सवामुळे बंद राहणार आहेत. यामुळे आपले बँकांमधील आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी बँकेला सुट्टी तर नाही हे तपासून घ्यावे.