आर्थिक

Car Loan Tips : कारसाठी लोन घेताय? तर लक्षात ठेवा या गोष्टी, अन्यथा होईल आर्थिक नुकसान

Car Loan Tips : आजकाल अनेकजण आर्थिक गरज भागवण्यासाठी कर्ज घेत असतात. कर्जाचे पैसे हे प्रत्येकजण वेगवेगळ्या कामासाठी वापरत असतो. कोणी घर बांधण्यासाठी तर कोणी नवीन कार खरेदी करण्यासाठी. कर्जाचे अनेक प्रकार आहेत.

वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, घर कर्ज आणि वैयक्तिक कर्ज असे कर्जाचे प्रकार आहेत. जर तुम्ही वाहन कर्ज घेत असाल तर तुम्ही अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. ज्यामुळे तुमचा फायदा होऊ शकतो.

कर्ज घेण्यापूर्वी आर्थिक परिस्थिती समजून घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही वेळोवेळी कर्जाची परतफेड करू शकत असाल तर तुम्ही कर्ज कर्ज घेऊ नका. तुम्हाला कर्ज देताना बँकेकडून देखील खालील अनेक गोष्टींची पडताळणी केली जाते.

क्रेडिट स्कोअर

जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्यासाठी गेला आणि तुम्हाला वाहन कर्ज हवे असेल तर सर्वात प्रथम तुमचा क्रेडिट स्कोअर पाहिला जातो. त्यामुळे जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्याची वेळेआधीच परतफेड करा. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर सुधारेल. जर तुमचा क्रेडिट स्कोर खराब असेल तर तुम्हाला बँकेकडून कर्ज दिले जात नाही.

कर्जाचा कालावधी

जर तुम्ही वाहन कर्ज घेत असाल तर कर्जाचा योग्य तो कालावधी निवडणे आवश्यक आहे. कारण तुम्ही निवडलेल्या कालावधीमध्येच तुम्हाला करंजाची परतफेड करायची असते. तुम्ही तुमच्या आर्थिक सोयीनुसार तुमचा कर्जाचा कालावधी घेऊ शकता. तुम्हाला तीन, पाच आणि सात वर्षासाठी वाहन कर्ज दिले जाते.

व्याज दर

कोणत्याही बँकेचे वाहन कर्ज घेत असताना तुम्ही त्या बँकेकडून वार्षिक कित्ती व्याजदर आकारले जात आहे हे नक्की तपासा. कारण प्रत्येक बँकेचा व्याजदर हा वेगवेगळा असतो. त्यामुळे तुम्ही वाहन कर्ज घेताना वेगवेगळ्या बँकांचे व्याजदर तपासून पहा.

कर्जाची रक्कम

जर तुम्ही वाहन कर्ज घेत असाल तर तुम्हाला किती कर्ज घेईचे आहे आणि बँकेकडून तुम्हाला किती कर्ज दिले जात आहे हे तपासावे लागेल. जर तुम्ही हे तपासून नाही पाहिल्यास तुमची आर्थिक गैरसोय होऊ शकते. तसेच तुम्ही दरमहा कर्जाची किती रक्कम फेडू शकता हे देखील पहा.

अतिरिक्त शुल्क

अनेकदा कर्ज घेत असताना बँकेकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाते. यामध्ये अर्ज शुल्क, उत्पत्ति शुल्क आणि प्रीपेमेंट दंड यांसारख्या विविध शुल्कांचा समावेश आहे. याबद्दल तुम्हाला आगोदरच माहिती असणे आवश्यक आहे. या अतिरिक्त शुल्काबद्दल माहिती जाणून घ्या आणि नंतरच तुम्ही कर्जाची प्रक्रिया पूर्ण करा.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts