Central Bank Of India : जेव्हा आपण बचत करण्याची योजना आखतो तेव्हा पाहिले नाव समोर येते ते म्हणजे मुदत ठेवी. सध्या देशात लाखो लोकांच्या मुदत ठेवी आहेत. एफडी ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक असून, अलीकडेच यावरील व्याजदरात देखील वाढ होत आहे. अशातच आज आम्ही अशा एका बँकेचे नाव सांगणार आहोत, जी आपल्या मुदत ठेवींवर सर्वाधिक परतावा ऑफर करत आहे.
आम्ही सध्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एफडीबद्दल बोलत आहोत, या बँकेने नुकतेच आपले व्याजदर वाढवले आहेत. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवला आहे.
2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर किती व्याज मिळेल?
नुकतीच सेंट्रल बँक ऑफ इंडियाने एफडी व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या एफडीवरील व्याजदरात सुधारणा केली आहे. 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर ग्राहकांना 3.5 ते 7 टक्के व्याजदराचा लाभ मिळत आहे. तर, ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना FD वर 4 ते 7.50% पर्यंत व्याज मिळत आहे.
नवीन व्याजदर कधी लागू होणार?
सेंट्रल बँक ऑफ इंडियाने 2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर नवीन व्याजदर लागू केला आहे. 10 जानेवारी 2024 पासून सामान्य लोकांना 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 7 टक्के व्याजदर मिळत आहे आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्क्यांपर्यंत व्याजाचा लाभ मिळेल.
नवीन व्याजदरांची यादी !
-7 ते 14 दिवसांच्या एफडीवर 3.75 टक्के व्याज मिळेल.
-15 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 3.75 टक्के व्याज मिळेल.
-46 दिवसांच्या एफडीवर 4.50 टक्के व्याज मिळेल.
-60 दिवस ते 90 दिवसांच्या FD वर 4.75 टक्के पर्यंत व्याज मिळेल.
-91 दिवस ते 179 दिवसांच्या FD वर 5.50 टक्के पर्यंत व्याज मिळेल.
-180 ते 270 दिवसांच्या FD वर 6 टक्के व्याज मिळेल.
-271 दिवस ते 364 दिवसांच्या FD वर 6.25 टक्के पर्यंत व्याज मिळेल.