आपत्कालीन हॉस्पिटलची परिस्थिती, मुलांचे शिक्षण तसेच लग्न किंवा घराचे नूतनीकरण इत्यादी कामांकरिता व्यक्तीला अचानकपणे पैशांची गरज भासते. परंतु या गोष्टीसाठी लागणारा पुरेसा पैसा आपल्याकडे राहिलच असे होत नाही. त्यामुळे बँका किंवा एनबीएफसी यांच्याकडून कर्जाचा पर्याय मोठ्या प्रमाणावर स्वीकारला जातो व यामध्ये पर्सनल लोन घेतले जाते. तसे पाहायला गेले तर प्रत्येक बँक पर्सनल लोनची सुविधा पुरवते व प्रत्येक बँकेच्या पर्सनल लोनचे वैशिष्ट्ये देखील वेगवेगळे असतात.
यामध्ये जर आपण सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा विचार केला तर या बँकेच्या माध्यमातून तुम्ही मुलांचे शिक्षण तसेच लग्न किंवा हॉस्पिटल, घराचे नूतनीकरण इत्यादी कामांकरिता कमाल वीस लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होते. सेंट्रल बँकेकडून तुम्ही बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून कर्जासाठी अर्ज करून देखील कर्ज घेऊ शकतात किंवा बँकेच्या शाखेला भेट देऊन देखील ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाची पर्सनल लोन सुविधा
सेंट्रल बँक ऑफ इंडिया पर्सनल लोन सुविधा अंतर्गत बँक कर्जदारांना त्यांच्या वैयक्तिक किंवा घरगुती गरजांसाठी जास्तीत जास्त वीस लाख रुपये पर्यंत वैयक्तिक कर्ज देते. बँकेकडून पर्सनल लोनची रक्कम ही अर्जदाराची जी काही एकूण पगार आहे त्याच्या 20 पट दिली जाते. तसेच बँकेच्या माध्यमातून कर्जदाराला हे पर्सनल लोन परतफेडीची मुदत ही सात वर्ष म्हणजे 84 महिन्यांची दिली जाते. इतकेच नाही तर सेंट्रल बँक पाच वर्षाच्या परतफेडच्या कालावधीसाठी वैयक्तिक गरजांकरिता पेन्शनधारकांना त्यांच्या मासिक पेन्शनच्या 18 पट म्हणजे जास्तीत जास्त दहा लाख रुपये कर्जाची रक्कम देखील देते.
सेंट्रल बँकेच्या माध्यमातून देण्यात येणारे या वीस लाख रुपये पर्सनल लोनवर 12 ते 12.75 टक्क्यांपर्यंत व्याजदर आकारला जातो व परतफेडीचा कालावधी सात वर्षापर्यंतचा आहे. तसेच पेन्शन धारकांसाठी 10.95% इतका आहे. जर आपण या कर्जावरील प्रक्रिया शुल्क पाहिले तर ते संरक्षण कर्मचाऱ्यांसाठी कर्ज रकमेच्या एक टक्क्यांपर्यंत इतके असते. यासोबतच दस्तऐवजीकरण शुल्क दोन लाखांपर्यंत 270 अधिक जीएसटी व दोन लाखापेक्षा जास्त 450 अधिक जीएसटी व संरक्षण कर्मचाऱ्यांसाठी शून्य टक्के व पेन्शन धारकांसाठी पाचशे रुपये अधिक जीएसटी इतके शुल्क लागते.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या पर्सनल लोनची वैशिष्ट्ये आणि फायदे
1- सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून ग्राहकांच्या वैयक्तिक आणि घरगुती गरजांकरिता वैयक्तिक कर्ज सुविधा देते.
2- बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांचे एकूण उत्पन्नाच्या वीस पट कर्ज देण्यात येते.
3- बँकेच्या वैयक्तिक म्हणजेच पर्सनल लोन अंतर्गत ग्राहकांना कमाल वीस लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन मिळू शकते.
4- विशेष म्हणजे जेव्हा कर्ज मंजूर होते तेव्हा काही मिनिटात पैसे कर्जदाराच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात.
5- कायमस्वरूपी रोजगार असलेले लोक ज्यांचे उत्पन्नाचे नियमित स्त्रोत आहेत ते या कर्जासाठी अर्ज करू शकतात.
6- संरक्षण कर्मचाऱ्यांना बँकेच्या वैयक्तिक कर्जावरील प्रक्रिया शुल्क आणि दस्तऐवजीकरण शुल्कावर सूट देण्यात आली आहे.
7- सेंट्रल बँकेच्या वैयक्तिक कर्ज योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या एकूण महिन्याच्या पगाराच्या 50% पर्यंत कर्ज ईएमआय म्हणून भरणे तुम्ही निवडू शकतात.
8- तसेच तुमची इच्छा असल्यास तुम्ही तुमच्या नियोक्त्याकडून हमी घेऊन ही मर्यादा 60% पर्यंत वाढवू शकतात.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया वैयक्तिक कर्ज पात्रता निकष
1- केंद्र/ राज्य सरकार, सरकारी हॉस्पिटल किंवा इतर कोणत्याही सरकारी संस्थांमध्ये शिकणारी आणि एक वर्षापर्यंत काम केलेले सर्व कायम कर्मचारी या कर्जासाठी अर्ज करू शकतात.
2- भारतीय कंपन्या तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून काम करणारे आणि किमान तीन वर्षे सेवा पूर्ण केलेले लोक देखील या कर्जासाठी अर्ज करू शकता.
3- सेंट्रल बँक वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे किमान मासिक उत्पन्न रुपये 15000 म्हणजेच वार्षिक उत्पन्न एक लाख 80 हजार रुपये असणे आवश्यक आहे.
4- वरती उल्लेख केलेले सर्व व्यक्ती त्यांचे सेंट्रल बँकेत गेल्या बारा महिन्यांपासून खाते आहे ते वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करण्यास पात्र असतात.
कुठली लागतात कागदपत्रे?
या कर्जासाठी अर्ज करताना अर्जदाराकडे केवायसी कागदपत्रे म्हणजेच पॅन कार्ड, आधार कार्ड तसेच पत्त्याचा पुरावा, बँक स्टेटमेंट, पगार स्लिप तसेच प्राप्तिकर परतावा व पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहे.
अशा पद्धतीने करू शकतात ऑफलाईन अर्ज
तुम्हाला जर पर्सनल लोनसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही आता ऑफलाइन पद्धतीने या कर्जाकरिता अर्ज करू शकतात. कारण अद्याप पर्यंत सेंट्रल बँकेच्या वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करण्याची ऑनलाईन लिंक अधिकृत वेबसाईटवर दिलेली नाही. ऑफलाइन अर्ज करता तुम्हाला सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या जवळच्या शाखेत जाऊन ऑनलाइन अर्ज मिळवता येतो. या अर्जावर तुम्ही विचारलेली सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे जोडून आणि तो अर्ज बँकेत जमा करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. जर तुमच्याकडे बँकेच्या शाखेत जाण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करून ऑनलाईन अर्ज देखील करू शकतात.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वैयक्तिक कर्जासाठी अर्जदाराला हमी द्यावी लागते का?
जर सेंट्रल बँक ऑफ इंडिया कडून वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर कर्जासाठी अर्जदाराला कोणत्याही प्रकारचे तारण म्हणजेच हमी देण्याची आवश्यकता नसते.